Commonwealth Games 2026 Judo : उन्नती शर्मा सेमीफायनलमध्ये 
क्रीडा

Commonwealth Games 2026 Judo : उन्नती शर्मा सेमीफायनलमध्ये

राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मधील ज्युदो प्रकारात भारताची ज्युदोपटू उन्नती शर्मा हिने महिलांच्या ६३ किलो वजन गटाची सेमीफायनल गाठून सुवर्णपदकाची आशा जिवंत ठेवली आहे.

Swapnil S

ग्लासगो : राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मधील ज्युदो प्रकारात भारताची ज्युदोपटू उन्नती शर्मा हिने महिलांच्या ६३ किलो वजन गटाची सेमीफायनल गाठून सुवर्णपदकाची आशा जिवंत ठेवली आहे. दुसरीकडे, पुरुषांच्या ८१ किलो वजन गटात हर्ष टोकसने रिपेचेज फेरीत विजय मिळवत कांस्यपदकाची शर्यत जिवंत ठेवली आहे.

महिलांच्या ७० किलो गटात इनुंगनबी ताखेलंबाम आणि पुरुषांच्या ९० किलो गटात करणजित सिंह मान यांचे आव्हान रिपेचेज फेरीत संपुष्टात आले. उन्नती शर्माने उपउपांत्यपूर्व फेरीत इस्वातिनीच्या लामुलेला मागागुला हिचा १ मिनिट ३ मिनिटे ३९ सेकंदांत 'इप्पॉन' द्वारे पराभव करत धडाकेबाज सुरुवात केली होती.

त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत तिने अत्यंत चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या कोना ख्रिस्ती हिचा 'वझा-अरी' आणि 'युको' गुणांच्या जोरावर पराभव करत अंतिम चारमधील स्थान निश्चित केले.

पुरुषांच्या ८१ किलो वजन गटात हर्ष टोकसला सायप्रसच्या ओडिसियस जॉर्गाकिसकडून ०-१ असा निसटता पराभव पत्करावा लागला होता. मात्र, टोकसने रिपेचेज लढतीत पेनियामिना पर्सिव्हलचा पराभव करत कांस्यपदकाची शर्यत जिवंत ठेवली.

पुरुषांच्या ९० किलो गटात करणजित सिंह मानने न्यूझीलंडच्या इलियट कॉनोलीचा ३ मिनिटे २९ सेकंदांत 'इप्पॉन'द्वारे पराभव केला होता. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत त्याला कॅनडाच्या गिलाउम गॉलीनकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर रिपेचेज फेरीत स्थानिक खेळाडू स्कॉट कुसॅककडून पराभूत झाल्याने त्याचे आव्हान संपले.

महिलांच्या ७० किलो गटात इनुंगनबी ताखेलंबामला उपांत्यपूर्व फेरीत कॅनडाच्या चार्ली थिबॉल्टकडून ३ मिनिटे २३ सेकंदांत 'इप्पॉन'द्वारे पराभव पत्करावा लागला आणि नंतर रिपेचेज फेरीत इंग्लंडच्या जेमिमा येट्स-ब्राऊनकडून पराभूत झाल्याने तिचेही आव्हान संपुष्टात आले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली