ESPN UK/ X
क्रीडा

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा: गतविजेत्या अर्जेंटिनाचा विजयारंभ

Swapnil S

अटलांटा : गतविजेत्या अर्जेंटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची धडाक्यात सुरुवात करताना कॅनडावर २-० असा विजय मिळवला. दोन्ही गोलसाठी सहाय्य करणारा (असिस्ट) कर्णधार लिओनेल मेस्सी पुन्हा संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अमेरिका येथे १६ संघांत यंदा ही स्पर्धा सुरू आहे.

मर्सिडीज बेन्झ स्टेडियमवर झालेल्या अ-गटातील या लढतीत कॅनडाने पहिल्या सत्रात अर्जेंटिनाला कडवी झुंज दिली. त्यामुळे दोन्ही संघांत पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी राहिली. मात्र दुसऱ्या सत्रात ४९व्या मिनिटाला मेस्सीच्या पासवर जुलियन अल्वारेझने अर्जेंटिनासाठी पहिला गोल नोंदवला. त्यानंतर ८८व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या लॉटारो मार्टिनेझने संघासाठी दुसरा गोल नोंदवून विजय सुनिश्चित केला. अर्जेंटिनाची पुढील लढत २६ तारखेला चिलीविरुद्ध होईल. २०२१ मध्ये कोपा अमेरिका, तर २०२२मध्ये फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या अर्जेंटिनाला यंदा सलग तिसरे आंतरराष्ट्रीय जेतेपद मिळवण्याची संधी आहे.

अ-गटातील अन्य लढतीत चिलीने पेरूला गोलशून्य बरोबरीत रोखले. ब-गटात व्हेनेझुएलाने इक्वेडोरला २-१ असे नमवले, तर मेक्सिकोने जमैकावर १-० अशी मात केली.

आजचे सामने

> उरुग्वे वि. पनामा (सकाळी ६.३० वा.)

> ब्राझील वि. कोस्टा रिका (मध्यरात्री ३.३० वा.)

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था