क्रीडा

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे ने दिली पुन्हा एकदा गुड न्यूज

अजिंक्य रहाणे सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खराब कामगिरी केल्यानंतर अजिंक्य संघाबाहेर

वृत्तसंस्था

टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) घरी पुन्हा एका पाळणा हल्ल्याने आनंदाची (Good News) बातमी समोर येत आहे. अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा पिता झाला आहे. अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका यांनी त्यांच्या घरी मुलगा झाल्याची घोषणा केली. राधिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून अजिंक्य आणि राधिका दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. अजिंक्य आणि राधिकाने सप्टेंबर 2014 मध्ये लग्न केले. ऑक्टोबर 2019 मध्ये अजिंक्यच्या घरी पहिल्यांदा पाळणा हलला. आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती अजिंक्यने दिली. त्याने आपल्या सर्व मित्र-परिवार, कुटुंबीय आणि चाहत्यांचे आभार मानले

अजिंक्य रहाणे सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खराब कामगिरी केल्यानंतर अजिंक्य संघाबाहेर आहे. त्याला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले होते. मात्र त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता