चेन्नई-कोलकातामध्ये तळाचे स्थान टाळण्यासाठी द्वंद्व 
क्रीडा

IPL 2026 : चेन्नई-कोलकातामध्ये तळाचे स्थान टाळण्यासाठी द्वंद्व

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी होणाऱ्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स आमनेसामने येतील. दोन्ही संघ तूर्तास गुणतालिकेत अनुक्रमे नवव्या व दहाव्या स्थानी आहेत. त्यामुळे तळाचे स्थान टाळण्यासाठी दोघांमध्ये द्वंद्व पाहायला मिळेल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ही लढत रंगणार आहे.

Swapnil S

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी होणाऱ्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स आमनेसामने येतील. दोन्ही संघ तूर्तास गुणतालिकेत अनुक्रमे नवव्या व दहाव्या स्थानी आहेत. त्यामुळे तळाचे स्थान टाळण्यासाठी दोघांमध्ये द्वंद्व पाहायला मिळेल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ही लढत रंगणार आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. त्यामुळे स्पर्धेचा ज्वर हळूहळू वाढत आहे.

चेन्नईसाठी जमेची बाब म्हणजे संजू सॅमसनला सूर गवसला आहे. त्याने शतकी खेळी साकारली. चेन्नईने नुकताच दिल्लीला पराभूत केले. तसेच गोलंदाजीही लयीत आहे. कोलकाताला मात्र अद्याप पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. त्यांनी फक्त रद्द लढतीचा एक गुण कमावला आहे. मात्र तीन पराभवांमुळे कोलकाताचा संघ यंदा संघर्ष करत आहे. अशा स्थितीत त्यांच्याकडून मंगळवारी कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.

खेळपट्टीचा अंदाज

या लढतीवर पावसाचे सावट नसेल. तसेच चेन्नईमध्ये गेल्या लढतीत धावांचा वर्षाव पाहायला मिळाला. आतासुद्धा त्याच खेळपट्टीवर लढत होणार असल्याने कोलकाताच्या गोलंदाजांचा कस लागू शकतो. फिरकीपटूंनाही सहाय्य लाभण्याची शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, अकील होसेन, अमन खान, अंशुल कंबोज, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, गुर्जापनित सिंग, जेमी ओव्हर्टन, कार्तिक शर्मा, खलिल अहमद, मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, मुकेश चौधरी, नूर अहमद, प्रशांत वीर, राहुल चहर, रामकृष्ण घोष, सर्फराझ खान, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, उर्विल पटेल, झॅक फोल्क्स.

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), फिन ॲलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, रोवमन पॉवेल, सार्थक रंजन, टिम सेईफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, सुनील नरिन, अनुकुल रॉय, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी, प्रशांत सोलंकी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, मथीशा पाथिराना, उमरान मलिक, नवदीप सैनी.

रुग्णालयच आता होणार अर्जदार! अर्जमंजुरीची प्रक्रिया ८ तासांत; सीएम सहाय्यता निधीची नवीन प्रणाली

रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद

बिहारमध्ये सत्तांतराच्या हालचालींना वेग; नितीश कुमार आज देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

'धुरंधर २' मोडणार 'पुष्पा २'चा विक्रम; चित्रपटाने २५ दिवसांत कमावले १७१२ कोटी; परदेशातील कमाई ४१५ कोटींची

काॅर्पोरेट जिहाद प्रकरणाची TCS कडून चौकशी; नाशिकमधील प्रकार क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया