क्रीडा

कुस्ती महासंघाची निवडणूक पुन्हा लांबणीवर, ११ जुलैचा नवा मुहूर्त

महासंघाच्या मावळत्या कार्यकारिणीने बरखास्त केलेल्या संघटनांमधील वाद नव्या निवडणुकीत अडथळा ठरला आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत एकामागे एक अडथळे येण्याची परंपरा कायम आहे. महासंघाच्या मावळत्या कार्यकारिणीने बरखास्त केलेल्या संघटनांमधील वाद नव्या निवडणुकीत अडथळा ठरला आहे. पाच वादग्रस्त संघटनांच्या चौकशीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्त न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांनी निवडणुकीसाठी ११ जुलैचा नवा मुहूर्त काढला आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांसारख्या नामांकित कुस्तीपटूंनी गेल्या महिन्यात आंदोलन केले. त्यानंतर आता बृजभूषण हे महासंघाचे अध्यक्ष नसतील, हे स्पष्ट झाले असून नवा अध्यक्ष तसेच कार्यकारिणी मंडळ ठरवण्यासाठी महासंघ निवडणूक घेणार आहे. मात्र आतापर्यंत ३ ते ४ वेळा विविध कारणांनी महासंघाची निवडणूक लांबणीवर पडली आहे.

निवडणूक मतदारासाठी राजस्थान, महाराष्ट्र, हरयाणा, तेलंगण आणि हिमाचल प्रदेश राज्य संघटनांनी आमचा मताधिकार काढणे योग्य नसल्याची तक्रार केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी बोलावले होते. आता मतदानाच्या अधिकाऱ्याविषयी निर्णय घेण्यासाठी पुरेसा कालावधी आवश्यक असल्याने निवडणूक ११ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

अमेरिकेत सराव करण्याची कुस्तीपटूंची मागणी

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करण्याकरता अमेरिकेत त्यांची व्यवस्था करावी, असा आशयाची मागणी करणारे पत्र कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे. यामध्ये विनेश, बजरंग, साक्षी, संगीता फोगट आणि सत्यवर्त कडियान यांचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संपूर्ण भारतीय चमूची नावे क्रीडामंत्र्यांना १५ जुलैपर्यंत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे (आयओए) द्यायची आहेत. कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे सध्या ही यादी प्रलंबित असून भारताचे अन्य क्रीडा प्रकारातील खेळाडू स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत.

Mumbai : कधी सुरू होणार CNG पुरवठा? MGL ने दिली महत्त्वाची माहिती; जाणून घ्या सविस्तर

शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याने अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल; म्हणाले, "आम्ही कोणाला घाबरणारे...

"माझे काका....कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून..."; बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

Sheikh Hasina Sentenced To Death : मोठी बातमी! माजी पंतप्रधान शेख हसिना यांना मृत्यूदंडाची शिक्षा

सौदी अरेबियात भीषण अपघात; डिझेल टँकरला बस धडकल्याने ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, हेल्पलाइन क्रमांक जारी