@ICC
क्रीडा

ICC T20 WC : बेन स्टोक्सच्या संयमी अर्धशतकाने इंग्लड बनली टी-२० चॅम्पियन

पाकिस्तानला धूळ चारत इंग्लंड (England) संघाने फायनलमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी. बेन स्टोक्स ठरला सामन्याचा खरा हिरो.

प्रतिनिधी

इंग्लंडने (England) आयसीसी टी-२० विश्वचषकच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर ५ विकेट्सनी मात करत टी-२० विश्वकपावर आपले नाव कोरले. या सामन्यात खरा हिरो ठरला तो अष्टपैलू बेन स्टोक्स. कारण पाकिस्तानचे १३८ धावांचे माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लड संघाची स्थिती सुरुवातीला बिकट झाली होती. ४५ वर ३ विकेट असताना अष्टपैलू बेन स्टोक्सने संयमी खेळी करत अर्धशतक ठोकून संघाला विजय मिळवून दिला. त्याला हॅरी ब्रुक आणि मोईन अलीची चांगली साथ लाभली.

पाकिस्तानने इंग्लंडसमोर १३८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ विकेट्स गमावून १३७ धावा केल्या. पाकिस्तानची फलंदाजी या सामन्यात अपयशी ठरली. सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. शान मसूदने सर्वाधिक ३८ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार बाबरने ३२ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. इंग्लडने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला असून २०१०मध्ये त्यांनी पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला होता.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत