क्रीडा

नव्या कर्णधारांमध्ये आज जुगलबंदी! ऋतुराजचा चेन्नई आणि गिलचा गुजरात संघ सलग दुसऱ्या विजयासाठी उत्सुक

Swapnil S

चेन्नई : आयपीएलमध्ये मंगळवारी रंगणाऱ्या लढतीत ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल या दोन नव्या कर्णधारांमधील जुगलबंदी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या गतविजेत्या व गतउपविजेत्या संघांतील लढतीमध्ये कोण बाजी मारून सलग दुसरा विजय नोंदवणार, हे पाहणे रंजक ठरेल. चेपॉक स्टेडियमवर उभय संघ आमनेसामने येणार असून येथे फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून येईल.

यंदा २७ वर्षीय ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गतविजेत्या चेन्नईने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले. महेंद्रसिंह धोनी संघात असला तरी ऋतुराजकडे भविष्याच्या दृष्टीने चेन्नईचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्यामुळे तो फलंदाजीसह नेतृत्वातही छाप पाडण्यास आतुर आहे. रचिन रवींद्र, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे असे कौशल्यवान फलंदाज चेन्नईच्या ताफ्यात आहेत. गोलंदाजीत त्यांची महीष थिक्षणा आणि मुस्तफिझूर रहमान यांच्यावर प्रामुख्याने भिस्त आहे. २०२३मध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईला गुजरातवर मात केली होती.

दुसरीकडे, २४ वर्षीय गिलच्या कर्णधारपदाखाली गुजरातने रविवारी मुंबई इंडियन्सवर रोमहर्षक विजय मिळवला. दडपणाच्या स्थितीत गुजरातच्या गोलंदाजांनी कामगिरी उंचावली. त्यामुळे मंगळवारीसुद्धा राशिद खान, स्पेन्सर जॉन्सन, मोहित शर्मा, आर. साईकिशोर यांच्याकडून गुजरातला गोलंदाजीत सातत्य अपेक्षित आहे. फलंदाजीत त्यांना गिलकडून मोठ्या खेळीची आशा आहे. तसेच डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया व अझमतुल्ला ओमरझाई यांच्यावर गुजरातची फलंदाजी अवलंबून आहे. गुजरातला यंदा २०२३च्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त