क्रीडा

ब्रिजभूषण सिंह यांना न्यायालयाचा दिलासा ; 'या' अटीवर जामीन मंजूर

न्यायालयाने ब्रिजभूषण शरण सिंह यांचा जामीन अर्जाच्या याचिकेवरील निर्णय दुपारी चार वाजेपर्यंत राखून ठेवला होता

नवशक्ती Web Desk

महिला कुस्तीपटूंच्या लैगिक छळाचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे माजीअध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांच्या नियमीत जामीन याचिकेवरील निर्णय दुपारी चार वाजेपर्यंत राखून ठेवला होता. यावेळी दिल्ली पोलिसांच्या वकिलाने ते जामीन अर्जाला विरोध किंवा समर्थन करत नसून कायद्याच्या तरतुदीनुसार त्यावर कायतरी अॅक्शन घेतली पाहीजे, असं सांगितलं.

ब्रिजभूषण शरण सिंह यांना याआधी मंगळवार १८ जुलै रोजी कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणात दिलासा मिळाला होता. राऊस अव्हेन्यू कोर्टाने मंगळवारी ब्रिजभूषण आणि त्यांचे सहआरोपी विनोद तोमर यांना दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. यावेळी ब्रिजभूषण कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर झाले होते. आता आज (२० जुलै) ब्रिजभूषण सिंह जामीन अर्जावर सुनावणी झाली आहे.

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणी भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना अट देखील घातली आहे.

न्यायालयाला माहिती दिल्याशिवाय ब्रिजभूषण शरण सिंह यांना परदेश दौऱ्यावर जाताना येणार नाही, अशी अट हा जामीन देताना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने घातली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक