FIFA World Cup 2026 : क्रोएशियाने घानाचा विजयरथ रोखला; लुका मॉड्रिक ठरला विश्वचषकातील सर्वात वयस्कर पास देणारा खेळाडू x
क्रीडा

FIFA World Cup 2026 : क्रोएशियाने घानाचा विजयरथ रोखला; लुका मॉड्रिक ठरला विश्वचषकातील सर्वात वयस्कर पास देणारा खेळाडू

निकोला व्लासिक आणि पीटर सुसिक यांनी केलेल्या गोलच्या जोरावर क्रोएशियाने घानाचा २-१ ने पराभव केला. या विजयासह क्रोएशिया संघाने फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात ४० वर्षीय लुका मॉड्रिकने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून पास देण्याचा विक्रम नोंदवला.

Swapnil S

फिलाडेल्फिया : निकोला व्लासिक आणि पीटर सुसिक यांनी केलेल्या गोलच्या जोरावर क्रोएशियाने घानाचा २-१ ने पराभव केला. या विजयासह क्रोएशिया संघाने फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात ४० वर्षीय लुका मॉड्रिकने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून पास देण्याचा विक्रम नोंदवला.

सामन्याच्या ३१ व्या मिनिटाला पीटर सुसिकने पेनल्टी बॉक्सच्या बाहेरून गोल करत क्रोएशियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ७३ व्या मिनिटाला घानाच्या डेरिक लुकासेनने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर ८३ व्या मिनिटाला लुका मॉड्रिकच्या कॉर्नर किकवर निकोला व्लासिकने हेडरद्वारे गोल करत क्रोएशियाला २-१ ने विजय मिळवून दिला.

क्रोएशियाने या विजयामुळे एल गटात इंग्लंडपाठोपाठ दुसरे स्थान प्राप्त केले. घानाने गटात ४ गुणांसह तिसरे स्थान प्राप्त करून बाद फेरीतील स्थान निश्चित केले. याआधी घानाने २०१० नंतर पहिल्यांदाच बाद फेरी गाठली आहे. सामन्यांनंतर घानाचे प्रशिक्षक कार्लोस क्विरोज यांनी सांगितले की, “बचावफळीतील चुकांमुळे घानाने हा सामना गमावला.” क्रोएशियाचा बाद फेरीतील पुढील सामना ३ जुलै रोजी पोर्तुगाल यांच्याशी होणार आहे. सामन्यादरम्यान मॉड्रिकच्या कामगिरीचे सुसिक आणि व्हासिक या दोघांनीही कौतुक केले असून, तो आपल्या संघाचा खरा मार्गदर्शक असल्याचे म्हटले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'यूपीआय'ला AI चे बळ मिळणार; रोज १०० कोटी व्यवहाराचे लक्ष्य; एनपीसीआयचे सीईओ दिलीप आसबे यांची माहिती

ठाणे-पालघर जिल्हा बँकेत सहकार पॅनलची एकहाती सत्ता; २१ पैकी १५ जागांवर विजय संपादन; परिवर्तन पॅनलचा पराभव

मध्य रेल्वेच्या भाडे व्यतिरिक्त महसुलात १६ टक्क्यांची वाढ; मे अखेर २०.४८ कोटींची कमाई; विविध व्यावसायिक उपक्रमांतून वाढले उत्पन्न

मुरूडच्या मच्छिमारांसाठी 'रापण' उदरनिर्वाहाचे वरदान; पावसाळ्यात पारंपरिक मासेमारीला प्राधान्य; फीलसा माशाला बाजारात चांगला दर

प्रत्येक वॉर्डात नियुक्त होणार 'पेशंट नेव्हिगेटर'; कर्करोग रुग्णांसाठी BMC ची नवी यंत्रणा; २४ आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण