प्लाटाचा निर्णायक गोल; इक्वाडोरचा जर्मनीला धक्का, तब्बल २० वर्षांनी साखळी फेरीचा अडथळा ओलांडला Photo | X
क्रीडा

FIFA World Cup 2026 : प्लाटाचा निर्णायक गोल; इक्वाडोरचा जर्मनीला धक्का, तब्बल २० वर्षांनी साखळी फेरीचा अडथळा ओलांडला

गोंझालो प्लाटाने ७७व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर इक्वाडोरने इ-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात बलाढ्य जर्मनीला २-१ असा पराभवाचा धक्का दिला. याबरोबरच इक्वाडोरने ३ सामन्यांतील ४ गुणांसह गटात तिसरे स्थान मिळवूनही बाद फेरी गाठली.

Swapnil S

ईस्ट रदरफोर्ड : गोंझालो प्लाटाने ७७व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर इक्वाडोरने इ-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात बलाढ्य जर्मनीला २-१ असा पराभवाचा धक्का दिला. याबरोबरच इक्वाडोरने ३ सामन्यांतील ४ गुणांसह गटात तिसरे स्थान मिळवूनही बाद फेरी गाठली. २० वर्षांनी म्हणजेच २००६नंतर प्रथमच त्यांनी अशी कामगिरी केली. पराभवानंतरही जर्मनीने मात्र अग्रस्थानासह आधीच बाद फेरीतील स्थान पक्के केले होते.

न्यूयॉर्क स्टेडियमवरील या सामन्याच्या सुरुवातीलाच दुसऱ्या मिनिटाला लेरॉय सानेने गोल करत जर्मनीला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, नवव्या मिनिटाला निल्सन अँगुलोने गोल करत इक्वाडोरला १-१ अशी बरोबरी साधून दिली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. ७७व्या मिनिटाला कॉर्नर किकवर केविन रॉड्रिग्ज याने हेडरद्वारे पास दिल्यानंतर प्लाटा याने डाव्या पायाने चेंडू गोलजाळीत धाडून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली, जी शेवटपर्यंत टिकली.

इक्वाडोरचे मुख्य प्रशिक्षक सेबॅस्टियन बेकॅसेसी यांनी या विजयानंतर आनंद व्यक्त केला. संघाने कठीण परिस्थितीतून मार्ग काढत हे यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनीचे प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समन यांनी आपल्या संघाच्या खेळाबाबत निराशा व्यक्त केली. जर्मनीचे सलग ११ विजयांचे विजयी अभियान या सामन्यात थांबले आहे.

मेटलाईफ स्टेडियमवर ८०,६६३ प्रेक्षकांची या लढतीसाठी उपस्थिती होती. ज्यामध्ये इक्वाडोरच्या चाहत्यांची संख्या जर्मनीच्या तुलनेत अधिक होती.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

ठाण्यात ४० टक्के पाण्याची गळती; आमदार संजय केळकर यांचा आरोप

Mumbai : उच्च न्यायालयाचा पोलीस अधिकाऱ्याला २५ हजारांचा दंड; FIR ची प्रत नाकारणे अधिकाऱ्याला भोवले

वळगणीच्या 'चिवनी' मच्छीला ग्राहकांची पसंती; अवघ्या २० ते २५ दिवसांचीच उपलब्धता; बाजारात मोठी मागणी

मुंबईकरांना मिळणार पुनर्प्रक्रिया केलेले पिण्यायोग्य पाणी; भांडुपमध्ये तृतीय स्तरावरील प्रक्रिया केंद्राला मंजुरी, १ हजार ८२४ कोटींचा प्रकल्प