FIFA World Cup 2026 : काँगोच्या बचावाविरुद्ध इंग्लंडच्या ताऱ्यांचा कस X
क्रीडा

FIFA World Cup 2026 : काँगोच्या बचावाविरुद्ध इंग्लंडच्या ताऱ्यांचा कस

फिफा विश्वचषकातील बाद फेरीत बुधवारी रंगणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. हॅरी केनच्या इंग्लंडपुढे भक्कम बचाव करणाऱ्या काँगो प्रजासत्ताक संघाचे कडवे आव्हान असेल. तसेच बेल्जियमची झुंजार वृत्तीच्या सेनेगलशी गाठ पडेल.

Swapnil S

ईस्ट रदरफोर्ड : फिफा विश्वचषकातील बाद फेरीत बुधवारी रंगणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. हॅरी केनच्या इंग्लंडपुढे भक्कम बचाव करणाऱ्या काँगो प्रजासत्ताक संघाचे कडवे आव्हान असेल. तसेच बेल्जियमची झुंजार वृत्तीच्या सेनेगलशी गाठ पडेल.

१२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. या संघांना १२ गटांत विभागण्यात आले होते. त्यांपैकी आता ३२ संघांनी बाद फेरी (राऊंड ऑफ ३२) गाठली असून प्रत्येक लढतीनंतर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येईल, तर विजयी संघ जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळे थरार आणखी वाढणार आहे.

दरम्यान, इंग्लंडला यंदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र काँगोनेदेखील या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या केन, बेलिंघम यांचा कस लागेल. बेल्जियमकडून रोमेलू लुकाकू, केव्हिन डीब्रुएनेवर लक्ष असेल.

आजचे सामने

  • इंग्लंड वि. काँगो प्रजासत्ताक - (रात्री ९.३० वाजता)

  • बेल्जियम वि. सेनेगल - (मध्यरात्री १.३० वाजता)

  • अमेरिका वि. बोस्निया - (गुरुवारी पहाटे ५.३० वाजता)

  • थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स, झी सिनेमा आणि झी५ ॲप

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग