क्रीडा

भवानीची तलवार तळपली! आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारी पहिली भारतीय

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सी. ए. भवानी देवीने सोमवारी ऐतिहासिक कामगिरी केली. चीन येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेत भवानीने कांस्यपदकाची कमाई केली. आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.

भवानीला उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या झैनब देबिकोव्हाकडून १४-१५ असा निसटता पराभव पत्करावा लागला. मात्र उपांत्य फेरीत पराभूत झालेल्यांनाही कांस्यपदक मिळत असल्याने भवानीसह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. २९ वर्षीय भवानीने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक विजेत्या मिसाकी इमूराला १५-१० अशी धूळ चारली होती. मिसाकीने २०२२मध्ये जागतिक स्पर्धा जिंकली होती. तिच्याविरुद्ध भवानीने प्रथमच एखादी लढत जिंकली.

दरम्यान, या यशासाठी भारतीय तलवारबाजी संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी भवानीचे अभिनंदन केले आहे. भवानीला २०२१च्या ऑलिम्पिकमध्ये राऊंड ऑफ ३२पर्यंत मजल मारता आली. परंतु ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजी प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती पहिली खेळाडू ठरली होती.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त