क्रीडा

माजी कर्णधार विराट कोहली टॉप टेन मधून बाहेर, क्रमवारीत तेराव्या स्थानावर घसरण

वृत्तसंस्था

माजी कर्णधार विराट कोहलीवर सहा वर्षांनंतर कसोटी क्रिकेट क्रमवारीत ‘टॉप टेन’मधून बाहेर पडण्याची वेळ ओढवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली तेराव्या क्रमांकावर घसरला. चार स्थानाने त्याची घसरण झाली. सुमारे दोन हजार ५३ दिवसांनंतर तो कसोटी क्रमवारीत टॉप टेनमधून बाहेर पडला. २३ नोव्हेंबर २०१९ नंतर त्याने एकही शतक झळकविलेले नाही.

बर्मिंगहॅम कसोटीत भारताच्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शतक झळकावणाऱ्या इंग्लिश फलंदाजांना क्रमवारीत फायदा झाला. जो रूट ९२३ गुणांसह अव्वल स्थानावर कायम राहिला. त्याचवेळी जॉनी बेअरस्टो (७४२ गुण) तीन वर्षांनंतर टॉप-१० मध्ये परतला आहे. त्याने ११ गुणांची झेप घेतली. भारताकडून शतक झळकावणाऱ्या ऋषभ पंतलाही पाच स्थानांचा फायदा झाला. तो पाचव्या क्रमांकावर आला. टॉप-१० मध्ये भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन फलंदाज आहेत. पाचवी कसोटी न खेळलेल्या रोहित शर्माला एक स्थान गमवावे लागले. तो आता नवव्या क्रमांकावर आहे. विराटने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील शेवटचे शतक झळकविले. यानंतर त्याने १८ कसोटी सामन्यांमध्ये २७.२५ च्या सरासरीने केवळ ८७२ धावा केल्या. त्यात एकही शतक नाही. या कालावधीत जगातील सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो टॉप-३० मध्येही नाही. या यादीत तो ३४ व्या क्रमांकावर आहे. भारतीय फलंदाजांमध्ये विराटचा क्रमांक चौथा आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने ५ सामन्यात अवघ्या २४९ धावा केल्या.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम