क्रीडा

गुकेशची वर्ल्ड नंबर वन कार्लसनवर मात, फ्रीस्टाईल बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या स्थानी झेप

पहिल्या दिवशीच्या सलामीच्या सामन्यात गुकेशला फ्रान्सच्या अलीरेझा फिरौझा याच्याकडून पराभव पत्करावा लागला.

Swapnil S

वँगल्स (जर्मनी) : ग्रँडमास्टर डी. गुकेश याने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि अर्मेनियाच्या लेवॉन अरोनियन याच्यासह विद्यमान जगज्जेता डिंग लिरेन याच्यावर मात करत वेसेनहॉस चेस चॅलेंज स्पर्धेत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

पहिल्या दिवशीच्या सलामीच्या सामन्यात गुकेशला फ्रान्सच्या अलीरेझा फिरौझा याच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर गुकेशने चारपैकी तीन गुणांची कमाई करत दमदार कामगिरीची नोंद केली. जर्मनीचा विन्सेन्ट केयमार ३.५ गुणांसह अग्रस्थानी आहे. नोदिरबेक अब्दुसातोरोव्ह हासुद्धा ३ गुणांनिशी गुकेशसह दुसऱ्या स्थानी आहे. कार्लसन, फिरौझा आणि अमेरिकेचा फॅबियानो कारुआना हे दोन गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहेत.

जलद पद्धतीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत गुकेशची सर्वोत्तम कामगिरी कार्लसनविरुद्ध झाली. गुकेशने मिळालेल्या संधीचा फायदा उठवत कार्लसनला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. कार्लसनला मात्र आपल्या सर्वोत्तम खेळावर लक्ष केंद्रित करता आले नाही.

मनमानी वेतन कपातीला लगाम; कामाचे तास, साप्ताहिक सुट्टीबाबत महाराष्ट्र वेतन नियम २०२६ लागू

ठाणे : जिल्ह्यातील सर्व शाळा व आरोग्य केंद्रे होणार अत्याधुनिक; २६ जानेवारी २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; ८०० कोटींची तरतूद

Mumbai : कॅफे आयडियल, चेतनासह नऊ रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित; FDA ची मोठी कारवाई

Mumbai : वर्षभर रस्ते स्वच्छ ठेवा; VIP भेटीवेळीच देखावा नको; उच्च न्यायालयाने महापालिकेला सुनावले

PF खात्यात किती पैसे जमा आहेत? आता WhatsApp वर फक्त Hi पाठवा अन् A टू Z माहिती मिळवा; जाणून घ्या सोपी पद्धत