संग्रहित छायाचित्र  
क्रीडा

रोहित-विराट २०२७चा विश्वचषक खेळतील : गांगुली

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने रोहित-विराटची पाठराखण केली असून ते दोघेही २०२७चा विश्वचषक नक्कीच खेळतील, अशी आशा व्यक्त केली आहे.

Swapnil S

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने रोहित-विराटची पाठराखण केली असून ते दोघेही २०२७चा विश्वचषक नक्कीच खेळतील, अशी आशा व्यक्त केली आहे.

“रोहित-विराटने एकदिवसीय प्रकारात सातत्याने वर्चस्व गाजवले आहे. २०२३चा एकदिवसीय विश्वचषक व २०२५ची चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन्ही आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांनी निर्णायक वेळी धावा केल्या. त्यामुळे पुढील दीड वर्षात सामन्यांची योग्य निवड करून रोहित-विराटने फॉर्म टिकवला, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही,” असे गांगुली म्हणाला.

त्याशिवाय सप्टेंबरमध्ये रंगणाऱ्या आशिया चषकापूर्वी भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्याच्या निर्णयाचे गांगुलीने कौतुक केले आहे. “इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटींनंतर नक्कीच संघातील खेळाडूंची शारीरिक व मानसिक दमछाक झाली असेल. या मालिकेतील काही खेळाडू भारताच्या टी-२० संघाचाही भाग आहेत. त्यामुळे बीसीसीआयने ऑगस्ट महिन्यात आणखी एखादी मालिका न खेळवणे, हे नक्कीच खेळाडूंसाठी फलदायी आहे,” असे गांगुली म्हणाला. तसेच त्याने भारताच्या कसोटी कर्णधार शुभमन गिलवरही स्तुतिसुमने उधळली.

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा डोंबिवली स्थानकावर आज आणि उद्या रात्री पॉवर ब्लॉक

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

भारतात AI हब स्थापन होणार; गुगल करणार १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक: अदानीच्या सहकार्याने सर्वात मोठे डेटा सेंटर

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास