क्रीडा

पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन गौतम गंभीर संतापला; म्हणाला, "पैसे कमवण्याचे..."

नवशक्ती Web Desk

भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू आणि सध्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर असलेल्या गौतम गंभीरने भारताच्या माजी क्रिकेटपटूंना चांगलेच धारेवर धरले आहे. गंभीरला माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली पान मसाल्याची जाहिरात करणं काही रुचले नाही. त्यामुळे त्याने पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या माजी खेळाडूंवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी बोलताना त्याने तरुणांनी आपला आदर्श निवडताना आपली बुद्दी वापरावी असा सल्ला देखील दिला आहे. सुनिल गावस्कर, विरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल आणि कपिल देव यांच्या सारखे माजी क्रिकेटू पान मसाल्याची जाहिरात करताना दिसत आहेत. यावरुन गौतम गंभीरने संताप व्यक्त केला आहे.

या विषयावर व्यक्त होताना गंभीर म्हणाला की, फक्त पैसे कमावणे हे ध्येय नसले पाहीजे. पैसे कमवण्याचे इतरही मार्ग आहेत. यासाठी पान मसाल्याचा प्रचार करणे योग्य नाही. पुढे तो म्हणाला की, घृणास्पद आणि निराशाजनक असे दोन शब्द माझ्याकडे आहेत. घृणास्पद यासाठी कारण एखादा खेळाडू त्याच्या आयुष्यात पान मसाल्याची जाहिरात करेल असे मला वाटले नव्हते. निराशाजन यासाठी की, मी फक्त एकच सांगू शकतो की तुमचा आदर्श निवडताना बुद्धीचा वापर करा. तुम्ही तुमच्या कामाने ओळखले जातात. नावाने नाही. नावापेक्षा काम महत्वाचे आहे.

या विषयावर पुढे बोलताना तो म्हणाला की, तुम्हाला पान मसाल्याची जाहिरात करावी लागले इतका पैसा महत्वाचा नाही. पैसे कमवण्याचे इतरही मार्ग आहेत. देशातील तरुणांचे तुम्ही रोल मॉडेल आहात. त्यामुळे पैसे कमवण्याच्या अशा पद्धतीच्या ऑफर या धुडकावून लावता आल्या पाहिजे, असं म्हणत त्याने क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरचे उदाहरण दिले आहे.

सचिनचे उदाहरण देताना गौतम गंभीर याने सांगितले की, सचिन तेंडूलकरला २०-३० कोटी रुपयांची ऑफर आली होती. पण त्याने त्याच्या वडिलांना शब्द दिला होता की, तो कधीच तंबाखू आणि पान मसाल्याची जाहिरात तसेच प्रचार करणार नाही. त्यामुळे सचिन आजही तरुणांचा रोल मॉडेल आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे

क्रॉफर्ड मार्केटने टाकली कात, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार