क्रीडा

अखिल भारतीय स्नूकर स्पर्धेत गेहानीची खानवर मात

रंगतदार लढतींमध्ये करन चुग याने जिगर शाहविरुद‍्ध पाच फ्रेममधील शेवटच्या दोन फ्रेम जिंकत ३-२ मात केली

वृत्तसंस्था

नॅशनल स्पोर्ट्स क्‍लब ऑफ इंडिया (एनएससीआय) आयोजित एनएससीआय अखिल भारतीय स्नूकर ओपन (बॉल्कलाइन) स्पर्धेच्या फेज वनमधील तिसऱ्या फेरीत विशाल गेहानी याने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चुरशीच्या सामन्यात फैसल खान याच्यावर ३-१ (४४-६७, ५८-५३, ५१-४०, ४९-३४ असा विजय मिळवला.

त्यानंतर झालेल्या अन्य रंगतदार लढतींमध्ये करन चुग याने जिगर शाहविरुद‍्ध पाच फ्रेममधील शेवटच्या दोन फ्रेम जिंकत ३-२ (६१-१५, ३२-५४, ३२-६०, ७२-४०, ५८-२४) अशी मात केली. बाबू गायकवाड यानेही वरुण मोदी याचा त्याच फरकाने म्हणजे ३-२ (४५-५२, ६२-०२, ७०-३८, ४३-६३, ६०-५१) असा पराभव केला.

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे'

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले