क्रीडा

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ओपन स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टरला विजेतेपद

चिदंबरम, रॉबर्ट आणि साधवानी हे इतर सात जणांबरोबर दहाव्या फेरीनंतर आठ गुणांवर होते.

वृत्तसंस्था

भारताचा ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने ४१व्या विला दे बेनास्क्यू आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. त्याने अर्मानियाच्या रॉबर्ट होवहानिसयान आणि भारताच्याच रौनक साधवानी यांचा टाय ब्रेकरवर पराभव केला.

चिदंबरम, रॉबर्ट आणि साधवानी हे इतर सात जणांबरोबर दहाव्या फेरीनंतर आठ गुणांवर होते. माजी राष्ट्रीय विजेता चिदंबरमने टाय ब्रेकरवर सफाईदार पद्धतीने गुण मिळविल्यामुळे तो विजेता ठरला. रौनक साधवानी तिसऱ्या स्थानावर राहिला. अर्मानियाच्या रॉबर्ट होवहानिसयानला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

चिदंबरमने सलग चार फेऱ्या जिंकून स्पर्धेची सुरुवात धडाक्यात केली होती. त्यानंतर पुढील दोन फेरीत त्याला ड्रॉवर समाधान मानावे लागले. याचबरोबर चिदंबरमला आठव्या फेरीत चेक रिपब्लिकच्या जी एम व्होजटेक प्लाटकडून पराभवाचा पत्करावा लागला. त्यानंतर चिदंबरमने शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये जोरदार पुनरागमन करत स्पेनच्या मार्कोस लिआनेस ग्रासिया आणि अर्मानियाच्या ग्रँड मास्टर कारेनवर विजय मिळविला.

रैनक साधवानी हा १७ वर्षांच्या बुद्धिबळपटू १० फेऱ्यांपर्यंत अपराजीत राहिला. त्याने यातील सहा फेऱ्यात विजय मिळविला, तर चार फेऱ्या ड्रॉ राहिल्या. टाय ब्रेकरमध्ये सफाईदारपणा तो राखू शकला नाही.

दरम्यान, अरविंदचे त्याचे प्रशिक्षक आर. बी. रमेश यांनी ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे. याचबरोबर रौनक साधवानी याचेही अंतिम फेरीत संयुक्तरीत्या पहिला आणि टाय ब्रेकमध्ये तिसरा आल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक