गुलवीरची कांस्यदौड! 
क्रीडा

Commonwealth Games 2026 : गुलवीरची कांस्यदौड! एकाच राष्ट्रकुलमध्ये ॲथलेटिक्स प्रकारात दोन पदके जिंकणारा पहिला भारतीय

भारताचा धावपटू गुलवीर सिंहने शनिवारी मध्यरात्री राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. पुरुषांच्या ५,०‌०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकून राष्ट्रकुल स्पर्धेच्या या प्रकारात पदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यासोबतच एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये दोन पदके पटकावणारा तो देशाचा पहिलाच खेळाडू बनला आहे.

Swapnil S

ग्लासगो : भारताचा धावपटू गुलवीर सिंहने शनिवारी मध्यरात्री राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. पुरुषांच्या ५,०‌०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकून राष्ट्रकुल स्पर्धेच्या या प्रकारात पदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यासोबतच एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये दोन पदके पटकावणारा तो देशाचा पहिलाच खेळाडू बनला आहे.

विद्यमान आशियाई विजेता असलेल्या २८ वर्षीय गुलवीरने २८ जुलै रोजी १०,००० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. ॲथलेटिक्स स्पर्धांच्या अंतिम दिवशी शनिवारी त्याने ५,००० मीटर शर्यतीत १३ मिनिटे २४.९५ सेकंद वेळेसह तिसरे स्थान मिळवत या ऐतिहासिक दुहेरी यशावर शिक्कामोर्तब केले. या शर्यतीत केनियाच्या मॅथ्यू किपचुंबा किपसांगने १३:२३.६१ वेळेसह सुवर्णपदक पटकावले, तर १०,००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या काय रॉबिन्सनने १३:२४.७० वेळेसह रौप्यपदक जिंकले.

५,००० मीटर आणि १०,००० मीटर या दोन्ही प्रकारांत राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या गुलवीरने आपल्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा (१३:०३.९३) कमी वेळ नोंदवली. त्याचा शनिवारी नोंदवलेला वेळ त्याच्या स्वतःच्या १२:५९.७७ या राष्ट्रीय विक्रमापेक्षाही जास्त होता. २०२३च्या हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत १०,००० मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकणारा गुलवीर संपूर्ण शर्यतीदरम्यान आघाडीच्या खेळाडूंच्या गटात राहिला. अंतिम लॅपमध्ये त्याने वेग वाढवत अवघ्या ०.०४ सेकंदाच्या फरकाने केनियाच्या कॉर्नेलियस केमबोईला मागे टाकून कांस्यपदकावर कब्जा केला. एकूणच गुलवीरच्या या यशामुळे आता आशियाई स्पर्धेतही त्याच्या कामगिरीवर लक्ष असेल.

राज्य धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; राज्यात कायदा लागू, बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांना १० वर्षांपर्यंतचा कारावास

मुंबई ते वाढवण प्रवास वेगवान! उत्तन-विरार सी लिंक आता दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस महामार्गाला जोडण्यास मंजुरी

CSMT वर स्मार्ट डिजिटल डिस्प्ले प्रणाली; गाडीची अद्ययावत माहिती एका नजरेत उपलब्ध

Mumbai : पाणीकपात कायम; १०० टक्के पाणीसाठ्यासाठी आणखी सव्वा लाख दशलक्ष लिटरची गरज

Mumbai : दादरमध्ये चेंबरची संरक्षक ग्रील लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल