हरमनप्रीतकडे भारताचे कर्णधारपद कायम; ऑगस्टमध्ये रंगणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पुरुष संघ जाहीर X
क्रीडा

हरमनप्रीतकडे भारताचे कर्णधारपद कायम; ऑगस्टमध्ये रंगणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पुरुष संघ जाहीर

आगामी एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी २० सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून स्टार ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. १४ ते ३० ऑगस्ट दरम्यान बेल्जियम व नेदरलँड्स येथे संयुक्तपणे पुरुषांच्या १६व्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : आगामी एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी २० सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून स्टार ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. १४ ते ३० ऑगस्ट दरम्यान बेल्जियम व नेदरलँड्स येथे संयुक्तपणे पुरुषांच्या १६व्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

भारतीय संघसाठी नुकतीच झालेली प्रो लीग निराशाजनक ठरली होती. नऊ संघांच्या या स्पर्धेत भारताने चार विजय, पाच ड्रॉ आणि सात पराभवांसह आठवे स्थान मिळवले होते. आता भारतीय संघ विश्वचषकातील आपली कामगिरी सुधारण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. भारताने १९७५ मध्ये एकमेव विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताला पदक मिळवता आलेले नाही. यापूर्वी भारताने १९७१मध्ये कांस्य, तर १९७३मध्ये रौप्यपदक जिंकले होते. मुख्य म्हणजे गेले दोन विश्वचषक (२०१८, २०२३) भारतातच झाले होते. मात्र दोन्ही वेळेस भारताला उपांत्यपूर्व फेरीपुढे जाण्यात अपयश आले.

अनुभवी मध्यरक्षक आणि भारतासाठी सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू मनप्रीत सिंग याचे संघात पुनरागमन झाले असून संघात अनुभव आणि नवोदित खेळाडूंचा समतोल साधण्यात आला आहे. मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी सांगितले की, हा संघ अत्यंत संतुलित असून यात अनुभवासोबतच फॉर्ममध्ये असलेल्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. खेळाडूंनी ही जागा आपल्या कामगिरीच्या जोरावर मिळवली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताचा ड-गटात समावेश असून त्यांच्यासोबत इंग्लंड, पाकिस्तान आणि वेल्स हे संघ आहेत. भारतीय संघ १५ ऑगस्ट रोजी वेल्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर १७ ऑगस्टला इंग्लंड आणि १९ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध हाय-व्होल्टेज सामना खेळवला जाईल.

भारतीय संघ

हरमनप्रीत सिंग (कर्णधार), मोहित एच. एस., सूरज करकेरा, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमीत, यशदीप सिवाच, रजिंदर सिंग, आदित्य लालगे, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, निलकांता शर्मा, विवेक प्रसाद, दिलप्रीत सिंग, शिलानंद लाक्रा, सुखजीत सिंग, मंदीप सिंग, अभिषेक.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कर्जमाफीची अंतिम यादी लवकरच; प्राप्तिकर भरणाऱ्यांची माहिती मिळाल्यानंतरच यादी प्रसिद्ध होणार, पहिल्या टप्प्यात २५ लाख शेतकऱ्यांची नावे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शाही खानपान; खानपानावर प्रत्येक वर्षी ९ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च

Navi Mumbai : कर्तव्य संपले... पण माणुसकी नाही; रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला जीवदान

ठाण्यातील अग्निसुरक्षा धाब्यावर; शहरातील आकडेवारीने प्रशासनाची झोप उडाली

Sindhudurg : बांदावासीयांचा विरोध; शक्तिपीठ द्रूतगती महामार्गासाठी जमीन संपादनाविरोधात हरकती दाखल