मुंबई : एकीकडे भारतीय युवा संघाने एकदिवसीय विश्वचषक उंचावलेला असतानाच शनिवारपासून भारताचा वरिष्ठ संघ टी-२० विश्वचषकाच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. पाकिस्तान-नेदरलँड्स यांच्यात सलामीची लढत रंगणार असली, तरी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी होणाऱ्या भारत-अमेरिका सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.
७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदादेखील २० संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करणार असून या स्पर्धेत १५ फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. मात्र या लढतीविषयी संभ्रम कायम आहे.
दरम्यान, यंदा विश्वचषकात प्रथमच एका दिवशी प्रत्येकी तीन सामने ठेवण्यात आले आहेत. भारताचा पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया यांच्यासह अ-गटात समावेश करण्यात आला आहे.
भारताविरुद्ध आगामी टी-२० विश्वचषकातील सामना न खेळल्यास पाकिस्तानला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) याविषयी अखेरची ताकीद दिली आहे. मात्र तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मतावर ठाम राहत भारताविरुद्ध न खेळण्याचे ठरवले आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमारला याविषयी विचारण्यात आले.
भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदा प्रथमच २० संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करणार असून या स्पर्धेत १५ फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.
आयसीसीशी २०२७पर्यंत केलेल्या करारानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातील कोणतेही सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाही टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे होणार आहे. तसेच पाकिस्तान त्यांचे सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे. पाकिस्तानने रविवारीच विश्वचषकात आपण खेळणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी भारताविरुद्धची लढत खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच आता पाकिस्तान क्रिकेटचे भवितव्य धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे.
आयसीसीला जागतिक स्पर्धेत सर्वाधिक महसूल हा भारत-पाकिस्तान सामन्याद्वारे मिळतो. पाकिस्तानने ही लढत न खेळल्यास आयसीसी त्यांना स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर देखील करू शकते. तसेच पाकिस्तानला प्रक्षेपणकर्ते स्टार स्पोर्ट्स समूहाला नुकसानभरपाई द्यावी लागेल. बांगलादेशप्रमाणेच त्यांच्यावरही द्विराष्ट्रीय मालिकांवर निर्बंध येतील. पाकिस्तान सुपर लीगमध्ये विदेशी खेळाडूंना खेळण्यास आयसीसी मनाई करू शकते. त्यामुळे एकूणच आयसीसीचे न ऐकल्यास पाकिस्तानला मोठा फटका पडू शकतो.
दरम्यान, या स्पर्धेतून बांगलादेशने आधीच माघार घेतली आहे. त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे. १६ डिसेंबर रोजी अबुधाबी येथे आयपीएल २०२६च्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात कोलकाता संघाने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला ९.२० कोटी इतकी बोली लावून खरेदी केले. मात्र बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर सुरू असणाऱ्या अत्याचाराविरोधात तेथील खेळाडूंना आयपीएलमध्ये घेऊ नये, या मागणीने जोर धरला. परिणामी बीसीसीआयला आठवडाभरातच याची दखल घ्यावी लागली व त्यांनी रहमानला संघातून काढण्याचे आदेश कोलकाताला दिले. कोलकातानेदेखील देशभावना समजून हा निर्णय मान्य केला.
या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट मंडळाने मात्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी टी-२० विश्वचषकातील भारतात होणारे सामने अन्य ठिकाणी खेळवण्याची मागणी आयसीसीकडे केली. आयसीसीने ही मागणी फेटाळून लावल्यानंतर बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेण्याची भीती दर्शवली. तेव्हाही आयसीसीने बांगलादेशच्या खेळाडूंना, तेथील चाहत्यांना किंवा पत्रकारांना भारतात धोका नसेल, याची हमी दिली. तसेच ठराविक वेळेत निर्णय न घेतल्यास बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा विश्वचषकात समावेश केला जाईल, असेही स्पष्ट केले.
अखेरीस बांगलादेश निर्णयावर ठाम राहिल्याने आयसीसीने त्यांची गच्छंती केली. यामुळे बांगलादेश क्रिकेटचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच यापुढील आयसीसी स्पर्धा व द्विराष्ट्रीय मालिकांमध्ये त्यांना आणखी मानहानी सहन करावी लागू शकते. पाकिस्तानने बांगलादेशचे सामने त्यांच्या येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव सुचवला होता. तसेच बांगलादेशची हकालपट्टी झाल्यामुळे पाकिस्ताननेही आयसीसीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करून माघार घेण्याचे संकेत दिले होते. तूर्तास ते विश्वचषकात खेळणार आहेत. मात्र आयसीसीने ताकीद दिल्यावरही पाकिस्तानने नकार दिला, तर त्यांना नक्कीच मोठा धोका उद्भवू शकतो.
हेझलवूडसुद्धा विश्वचषकाला मुकणार
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जबर धक्का बसला आहे. पॅट कमिन्स आधीच स्पर्धेबाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलियाचा ब-गटात समावेश असून मिचेल मार्श त्यांचे नेतृत्व करत आहे.
हर्षित स्पर्धेबाहेर, सिराज भारतीय संघात
वेगवान गोलंदाज हर्षित राणा गुडघ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. हर्षितला आफ्रिकेविरुद्ध सराव सामन्यात दुखापत झाली. सिराज २०२४च्या विश्वचषकातही भारताचा सदस्य होता.
टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक (साखळी फेरी)
७ फेब्रुवारी शनिवार - पाकिस्तान वि. नेदरलँड्स - कोलंबो - सकाळी ११ वा.
७ फेब्रुवारी शनिवार - वेस्ट इंडिज वि. स्कॉटलंड - कोलकाता - दुपारी ३ वा.
७ फेब्रुवारी शनिवार - भारत वि. अमेरिका - मुंबई - सायं. ७ वा.
८ फेब्रुवारी रविवार - न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान - चेन्नई - सकाळी ११ वा.
८ फेब्रुवारी रविवार - इंग्लंड वि. नेपाळ - मुंबई - दुपारी ३ वा.
८ फेब्रुवारी रविवार - श्रीलंका वि. आयर्लंड - कोलंबो - सायं. ७ वा.
९ फेब्रुवारी सोमवार - इटली वि. स्कॉटलंड - कोलकाता - सकाळी ११ वा.
९ फेब्रुवारी सोमवार - झिम्बाब्वे वि. ओमान - कोलंबो - दुपारी ३ वा.
९ फेब्रुवारी सोमवार - दक्षिण आफ्रिका वि. कॅनडा - अहमदाबाद - सायं. ७ वा.
१० फेब्रुवारी मंगळवार - नेदरलँड्स वि. नामिबिया - दिल्ली - सकाळी ११ वा.
१० फेब्रुवारी मंगळवार - न्यूझीलंड वि. यूएई चेन्नई - दुपारी ३ वा.
१० फेब्रुवारी मंगळवार - पाकिस्तान वि. अमेरिका - कोलंबो - सायं. ७ वा.
११ फेब्रुवारी बुधवार - अफगाणिस्तान वि. दक्षिण आफ्रिका - अहमदाबाद - सकाळी ११ वा.
११ फेब्रुवारी बुधवार - ऑस्ट्रेलिया वि. आयर्लंड - कोलंबो - दुपारी ३ वा.
११ फेब्रुवारी बुधवार - इंग्लंड वि. वेस्ट इंडिज - मुंबई - सायं. ७ वा.
१२ फेब्रुवारी गुरुवार - श्रीलंका वि. ओमान - पाल्लेकेले - सकाळी ११ वा.
१२ फेब्रुवारी गुरुवार - इटली वि. नेपाळ मुंबई - दुपारी ३ वा.
१२ फेब्रुवारी गुरुवार - भारत वि. नामिबिया - दिल्ली - सायं. ७ वा.
१३ फेब्रुवारी शुक्रवार - ऑस्ट्रेलिया वि. झिम्बाब्वे - कोलंबो - सकाळी ११ वा.
१३ फेब्रुवारी शुक्रवार - कॅनडा वि. यूएई - दिल्ली - दुपारी ३ वा.
१३ फेब्रुवारी शुक्रवार - अमेरिका वि. नेदरलँड्स - चेन्नई - सायं. ७ वा.
१४ फेब्रुवारी शनिवार - आयर्लंड वि. ओमान - कोलंबो - सकाळी ११ वा.
१४ फेब्रुवारी शनिवार - इंग्लंड वि. स्कॉटलंड - कोलकाता - दुपारी ३ वा.
१४ फेब्रुवारी शनिवार - न्यूझीलंड वि. दक्षिण - आफ्रिका अहमदाबाद - सायं. ७ वा.
१५ फेब्रुवारी रविवार - वेस्ट इंडिज वि. नेपाळ - मुंबई - सकाळी ११ वा.
१५ फेब्रुवारी रविवार - अमेरिका वि. नामिबिया - चेन्नई - दुपारी ३ वा.
१५ फेब्रुवारी रविवार - भारत वि. पाकिस्तान - कोलंबो - सायं. ७ वा.
१६ फेब्रुवारी सोमवार - अफगाणिस्तान वि. यूएई - दिल्ली - सकाळी ११ वा.
१६ फेब्रुवारी सोमवार - इंग्लंड वि. इटली - कोलकाता - दुपारी ३ वा.
१६ फेब्रुवारी सोमवार - ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका - पाल्लेकेले - सायं. ७ वा.
१७ फेब्रुवारी मंगळवार - न्यूझीलंड वि. कॅनडा - चेन्नई - सकाळी ११ वा.
१७ फेब्रुवारी मंगळवार - आयर्लंड वि. झिम्बाब्वे - पाल्लेकेले - दुपारी ३ वा.
१७ फेब्रुवारी मंगळवार - स्कॉटलंड वि. नेपाळ - मुंबई - सायं. ७ वा.
१८ फेब्रुवारी बुधवार - दक्षिण आफ्रिका वि. यूएई - दिल्ली - सकाळी ११ वा.
१८ फेब्रुवारी बुधवार - पाकिस्तान वि. नामिबिया - कोलंबो - दुपारी ३ वा.
१८ फेब्रुवारी बुधवार - भारत वि. नेदरलँड्स - अहमदाबाद - सायं. ७ वा.
१९ फेब्रुवारी गुरुवार - वेस्ट इंडिज वि. इटली - कोलकाता - सकाळी ११ वा.
१९ फेब्रुवारी गुरुवार - श्रीलंका वि. झिम्बाब्वे - कोलंबो - दुपारी ३ वा.
१९ फेब्रुवारी गुरुवार - अफगाणिस्तान वि. कॅनडा - चेन्नई - सायं. ७ वा.
२० फेब्रुवारी शुक्रवार - ऑस्ट्रेलिया वि. ओमान - पाल्लेकेले - सायं. ७ वा.
सुपर-८ फेरी (२१ फेब्रुवारी ते १ मार्च)
उपांत्य फेरी (४ आणि ५ मार्च)
अंतिम सामना (८ मार्च)
(सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि जिओहॉटस्टार ॲपवर केले जाईल.)