क्रीडा

क्रिकेटरसिकांसाठी आयसीसीची युक्ती; भारत-पाक सामन्याचा आनंद स्टेडियममध्ये उभे राहून लुटता येणार

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न स्टेडियमवर २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटांची फेब्रुवारी महिन्यात पाच मिनिटांतच विक्री झाली

वृत्तसंस्था

एकीकडे चाहत्यांना आशिया चषकात होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीचे वेध लागले असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यासाठीही क्रिकेटरसिकांना आकर्षित करण्यासाठी वेगळी युक्ती अवलंबली आहे.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न स्टेडियमवर २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटांची फेब्रुवारी महिन्यात पाच मिनिटांतच विक्री झाली. त्यामुळे आता आयसीसीने आणखी ४ हजार तिकिटे विक्री करण्याचा निर्णय घेतला असून ही तिकिटे विकत घेणाऱ्यांना स्टेडियममध्ये उभे राहून सामन्याचा आनंद लुटता येईल. ३० ऑस्ट्रेलियन डॉलरचे एक तिकिट याप्रमाणे आयसीसी ही ४ हजार तिकिटे विकणार आहे. त्यामुळे आयसीसीने दर्दी क्रिकेटप्रेमींना लवकरात लवकर तिकिट बुक करण्याचे आवाहन केले आहे. त्याशिवाय १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्नलाच होणाऱ्या अंतिम सामन्याची तिकिटे अद्याप शिल्लक असल्याचेही आयसीसीने जाहीर केले. त्यावरूनच अंतिम लढतीच्या तुलनेत भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ किती आहे, हे सिद्ध होते.

जरांगेंचा पुन्हा इशारा; कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया १७ सप्टेंबरपूर्वी सुरू करा!

घेतलेला अन्याय्य जीएसटी परत करा

श्रेय-अपश्रेयापलीकडचा ‘सारथी’

आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार