क्रीडा

'मी अजून निवृत्ती घेतलेली नाही', मेरी कोमचे स्पष्टीकरण; सांगितले, कशी उठली निवृत्तीची अफवा ?

Swapnil S

भारताची स्टार बॉक्सर, सहा वेळा विश्वविजेती, मेरी कोम हिने निवृत्तीची घोषणा केल्याच्या बातम्या गुरूवारी सकाळपासूनच अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. मात्र, मेरी कोमने बॉक्सिंगमधून निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले आहे. 'मी अद्याप निवृत्ती घेतलेली नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला', असे स्वतः मेरी कोमने स्पष्ट केले आहे.

"माध्यमातील प्रिय मित्रांनो, मी अद्याप निवृत्तीची घोषणा केलेली नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला जेव्हा ही घोषणा करायची असेल तेव्हा मी वैयक्तिकरित्या मीडियासमोर येईन. मी निवृत्तीची घोषणा केल्याचे काही वृत्त मी बघितले, पण ते खरे नाहीत" असे मेरी कोमने एका निवेदनाद्वारे सांगितले आहे.

निवृत्तीची अफवा कशी उठली?

"मी 24 जानेवारी 2024 रोजी दिब्रुगडमधील एका शालेय कार्यक्रमात मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी गेले होते. तिथे बोलताना, 'माझ्यात अद्यापही खेळात यश मिळवण्याची भूक आहे, पण खेळू शकत असूनही ऑलिम्पिकमधील वयोमर्यादेमुळे मला भाग घेता येत नाही. मी अजूनही माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे आणि जेव्हा केव्हा मी निवृत्तीची घोषणा करेन तेव्हा मी सर्वांना माहिती देईन", असे म्हटले होते.

मेरी कोम 41 वर्षांची झाली आहे. यावरून मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या नियमांनुसार पुरुष आणि महिला बॉक्सर्सना 40 वयापर्यंतच बॉक्सिंगची परवानगी आहे. त्यामुळे मेरी कोमच्या वक्तव्याचा निवृत्तीशी संबंध जोडला गेला होता.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस