क्रीडा

नरिनचा शतकी धुमाकूळ

Swapnil S

कोलकाता : शांत स्वभावाच्या सुनीन नरिनने (५६ चेंडूंत १०९ धावा) मंगळवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर शतकी धुमाकूळ घातला. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध २० षटकांत ६ बाद २२३ धावांचा डोंगर उभारला.

संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. फिल सॉल्ट १३ चेंडूंत अवघ्या १० धावांवर बाद झाला, त्यावेळी हा निर्णय योग्य ठरणार, असेही वाटले. मात्र त्यानंतर ३५ वर्षीय नरिनने आक्रमक रूप धारण केले. आपल्या गोलंदाजीसाठी प्रामुख्याने ओळखल्या जाणाऱ्या नरिनने या हंगामात सलामीवीर म्हणून आधीच एक अर्धशतक झळकावले होते. मंगळवारी त्याने १३ चौकार व ६ षटकारांसह शतकी नजराणा पेश केला. मुंबईकर अंक्रिश रघुवंशीसह (३०) नरिनने दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी रचली.

रघुवंशी व कर्णधार श्रेयस अय्यर (११) बाद झाल्यावर धोकादायक आंद्रे रसेलसह नरिनची जोडी जमली. या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी चौथ्या विकेटसाठी १९ चेंडूंतच ५१ धावांची भागीदारी रचली. १६व्या षटकात चहलला चौकार लगावून नरिनने ४९ चेंडूंतच शतकाची वेस ओलांडली. रसेलने १३ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर रिंकू सिंग (नाबाद २०) व वेंकटेश अय्यरने (८) कोलकाताला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. कुलदीप सेन व आवेश खान यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलावर कारवाई होणार का? पुणे अपघातावर काय म्हणाले फडणवीस?

धक्कादायक! बारावीत ८७ टक्के गुण, तरीही केली आत्महत्या... कमी टक्केवारी मिळाल्यानं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

जेवणावरून झाला वाद अन् मित्रावरचं केला कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक 

मुंबईत संथ मतदान का? मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिले चौकशीचे आदेश

Pune Porsche crash: "पोलिसांवर दबाव आणला नाही, मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात"; राष्ट्रवादीच्या आमदाराचं स्पष्टीकरण