मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य; सूर्यकुमारच्या कामगिरीवर नजरा छायाचित्र- X (@BCCI)
क्रीडा

IND vs SA: मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य; सूर्यकुमारच्या कामगिरीवर नजरा

भारतीय पुरुष क्रिकेट संघाने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा टी-२० सामना खेळणार आहे. उभय संघांतील या मालिकेत भारत २-१ असा आघाडीवर असून लखनौच्या इकाना स्टेडियमवर ते विजयी आघाडी घेण्यासाठी उत्सुक असतील. मात्र भारताला कर्णधार सूर्यकुमार यादव व उपकर्णधार शुभमन गिल यांच्या कामगिरीची चिंता सतावत आहे.

Swapnil S

लखनौ : भारतीय पुरुष क्रिकेट संघाने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा टी-२० सामना खेळणार आहे. उभय संघांतील या मालिकेत भारत २-१ असा आघाडीवर असून लखनौच्या इकाना स्टेडियमवर ते विजयी आघाडी घेण्यासाठी उत्सुक असतील. मात्र भारताला कर्णधार सूर्यकुमार यादव व उपकर्णधार शुभमन गिल यांच्या कामगिरीची चिंता सतावत आहे.

पुढील वर्षी मायदेशात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड चाचणी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. भारताला विश्वचषकापूर्वी आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध मायदेशातच प्रत्येकी ५-५ टी-२० सामने खेळायचे आहेत. सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने पहिल्या सामन्यात आफ्रिकेचा १०१ धावांनी फडशा पाडला. मग दुसऱ्या लढतीत आफ्रिकेने भारताला धूळ चारली. तिसऱ्या लढतीत गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताने पुन्हा आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले. मात्र सूर्यकुमार व गिल यांना त्या लढतीतही मोठी खेळी साकारता आली नाही.

दरम्यान, आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्यांनी कसोटी मालिकेत भारताला २-० अशी धूळ चारली होती. मात्र एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित खेळाडूंच्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने आफ्रिकेला २-१ असे पराभूत केले. गिल व श्रेयस अय्यर हे नियमित कर्णधार व उपकर्णधार विविध दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकल्याने के. एल. राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात तसेच राहुलच्या नेतृत्वात भारताने उत्तम कामगिरी केली.

आता मोर्चा भारताच्या प्रामुख्याने युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या टी-२० मालिकेकडे वळेल. पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात भारतात टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी भारताला आफ्रिकेविरुद्ध ५, तर न्यूझीलंडविरुद्धही ५ टी-२० सामने खेळायचे आहेत. त्यामुळे मायदेशातील या १० लढतींद्वारे भारताला विश्वचषकासाठी आपले सर्वोत्तम १५ खेळाडू निवडण्याची संधी आहे. २०२४ मध्ये भारताने रोहितच्या नेतृत्वात आफ्रिकेला नमवूनच टी-२० विश्वचषक उंचावला होता. मात्र आता रोहित, विराट हे टी-२० संघाचा भाग नसल्याने भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने सप्टेंबरमध्ये आशिया चषकाचे जेतेपद मिळवले. मग ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांनाही टी-२० मालिकेमध्ये नमवले. भारताने २०२४च्या विश्वचषकानंतर अद्याप एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. गेल्या २७ टी-२० सामन्यांपैकी फक्त ४ लढतींमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे.

उभय संघांत आतापर्यंत ३४ टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी २०, तर दक्षिण आफ्रिकेने १३ लढती जिंकल्या आहेत. १ सामना रद्द करण्यात आला आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमरा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाझ अहमद.

दक्षिण आफ्रिका : एडीन मार्करम (कर्णधार), ओटनिल बार्टमन, कॉर्बिन बोश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डीकॉक, डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, आनरिख नॉर्किए, ट्रिस्टन स्टब्स, लुथो सिपामला.

वेळ : सायंकाळी ७ वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर