क्रीडा

IND vs Sri Lanka ODI : भारताचा श्रीलंकेला क्लीन स्वीप; कोहलीची 'विराट' खेळी

भारतीय क्रिकेट संघाने तिसरा सामना ३००हून अधिक धावांनी जिंकून एकदिवसीय मालिकेत (IND vs Sri Lanka ODI) ३ - ० असा विजय

प्रतिनिधी

तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला. (IND vs Sri Lanka ODI) भारतीय संघाने श्रीलंकेवर ३१७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने पाहिले फलंदाजी करत ३९० धावांचा डोंगर उभा केला.

यामध्ये भारतीय फलंदाजीने कमाल करत विराट कोहलीने (Virat Kohli) १६६ धावांची नाबाद खेळी केली. तर, शुभमन गिलने ११६ धावांची दमदार खेळी केली. तर, कर्णधार रोहित शर्माने ४६ धावा केल्या. विराट कोहलीने १६६ धावांच्या खेळीमध्ये ११० चेंडूत १३ चौकार आणि ८ षटकार मारले.

३९१ धावांचा डोंगर पार करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या ७३ धावांवरच आटोपला. यावेळी भारताकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजी मोहम्मद सिराजने १० षटकांत ३२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. दरम्यान, भारताने पहिल्या २ एकदिवसीय सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवत श्रीलंकेचा पराजय केला.

तिसरा सामना खिशात घालत भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिका ३-० अशी खिशात घातली. विराट कोहली हा मालिकावीर आणि सामनावीरही ठरला. त्याने ३ सामन्यांमध्ये २८३ धावा केल्या आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी