क्रीडा

T20 World Cup 2026 : भारत-अमेरिका सामना पाहायला जाताय? वानखेडे स्टेडियममध्ये 'या' वस्तूंना नो एंट्री; जाणून घ्या सविस्तर

पहिल्याच सामन्यात टीम इंडिया आणि अमेरिका आमनेसामने येणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. हजारो चाहत्यांची गर्दी अपेक्षित असल्याने, सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत. सामना पाहण्यासाठी स्टेडियमकडे निघण्याआधी काय नेता येईल आणि काय नेण्यास मनाई आहे, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Mayuri Gawade

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आजपासून (दि. ७) आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६चा थरार रंगणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडिया आणि अमेरिका आमनेसामने येणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. हजारो चाहत्यांची गर्दी अपेक्षित असल्याने, सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत. सामना पाहण्यासाठी स्टेडियमकडे निघण्याआधी काय नेता येईल आणि काय नेण्यास मनाई आहे, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

स्टेडियममध्ये काय नेता येईल?

प्रेक्षकांनी शक्य तितकं हलकं सामान सोबत ठेवावं, असा सल्ला देण्यात आला आहे. स्टेडियममध्ये केवळ मोजक्या वैयक्तिक वस्तूंनाच परवानगी असेल.

  • मोबाईल फोन

  • पाकीट, रोख रक्कम, क्रेडिट/डेबिट कार्ड

  • महिलांसाठी : लहान पर्स किंवा पाऊच

या वस्तूंना नो एंट्री

सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणासाठी खालील वस्तूंवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे-

इलेक्ट्रॉनिक वस्तू

  • पॉवर बँक, चार्जर

  • लॅपटॉप, टॅबलेट

  • कॅमेरा, दुर्बिणी

  • ब्लूटूथ इअरबड्स किंवा टीडब्ल्यूएस डिव्हाइस

वैयक्तिक वस्तू

  • हेल्मेट

  • छत्री

  • लायटर, मॅचबॉक्स

  • सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ

बॅग्स आणि खाद्यपदार्थ

  • बॅकपॅक, मोठ्या हँडबॅग

  • बाहेरचं अन्न

  • पाण्याच्या बाटल्या, कॅन

इतर

  • ज्वलनशील किंवा धोकादायक कोणतीही वस्तू

सामन्याच्या दिवशी उपयुक्त सूचना

  • लवकर पोहोचा : सायंकाळी ४ वाजता गेट्स उघडतील, तर उद्घाटन सोहळा साधारण ५.३० वाजता सुरू होईल.

  • पार्किंग नाही : स्टेडियमजवळ पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. चर्चगेट आणि मरीन लाईन्स ही जवळची रेल्वे स्थानकं सोयीची ठरतील.

  • रांगा आणि तपासणी : वाढीव सुरक्षेमुळे तपासणीस वेळ लागू शकतो. संयम ठेवा.

  • खाद्यपदार्थ : स्टेडियम परिसरात मिळणारे अन्न व पेये परवानगीयोग्य असतील.

थोडक्यात, सामना एन्जॉय करण्यासाठी नियम पाळणं गरजेचं आहे. योग्य तयारी करून, अनावश्यक वस्तू घरीच ठेवून निघालात, तर तुमचा वर्ल्ड कप पाहण्याचा अनुभव नक्कीच संस्मरणीय ठरेल.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके