ऋतुराज, पडिक्कल, साईची निराशा; भारत-अ संघाने मालिका गमावली X
क्रीडा

ऋतुराज, पडिक्कल, साईची निराशा; भारत-अ संघाने मालिका गमावली

भारत-अ संघाला ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६९ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांच्यावर मालिका पराभवाची नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलियाने तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

Swapnil S

पुद्दुचेरी : भारत-अ संघाला ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६९ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांच्यावर मालिका पराभवाची नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलियाने तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया-अ संघाने ४९.५ षटकांत २७५ धावांपर्यंत मजल मारली. सॅम कोन्स्टास (६७) व जोश फिलिपे (५८) यांनी अर्धशतके साकारली. अर्शद खानने ३, तर यश ठाकूरने २ बळी मिळवले. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना भारत-अ संघ ४५.२ षटकांत २०६ धावांत गारद झाला.

कर्णधार ऋतुराज गायकवाड (१२), देवदत्त पडिक्कल (१), साई सुदर्शन (१३) यांनी निराशा केली. रजत पाटीदारने ६७ धावांची एकाकी झुंज दिली. तसेच अनुकूल रॉय (नाबाद ३४) व विपराज निगम (२३) यांनी प्रतिकार केला. मात्र सुरुवातीलाच ४ बाद ५९ अशी अवस्था झाल्यानंतर भारतीय संघाने ठराविक अंतराने बळी गमावले. स्पेन्सर जॉन्सनने ३ गडी बाद केले.

उभय संघांतील कसोटी मालिकेत भारत-अ संघाने १-० असे यश मिळवले होते. मात्र एकदिवसीय मालिकेत भारताने दोन्ही लढतींत निराशा केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मोठी बातमी! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

MPSC Protest Pune : प्रकृती बिघडली, तिघांचे उपोषण मागे

विप निवडणुकीत बंडोबांचे आव्हान; नागपूरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दुफळी, शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटेंची माघार

जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला