क्रीडा

भारत अ संघाचा चार विकेट्स राखून विजय; कुलदीप यादवची हॅट्‌ट्रिक

न्यूझीलंड अ च्या डावातील ४७ व्या षट्कात कुलदीपने चौथ्या चेंडूवर एक विकेट घेतली.

वृत्तसंस्था

भारत 'अ' संघाकडून खेळणारा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने न्यूझीलंड ‘अ' विरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात हॅट्‌ट्रिक केली. भारत ‘अ’ संघाने हा सामना चार विकेट्स राखून जिंकला. कुलदीपच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडचा संघ २१९ धावात गारद झाला. त्यानंतर विजयाचे लक्ष्य भारत ‘अ’ संघाने ३४ षट्कात ६ बाद २२२ धावा करीत साध्य केले.

या सामन्यात कुलदीपने वॅन बीक, जो वॉकर आणि जेकब डफी यांना बाद करत निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांचे लक्ष वेधून घेतले.

न्यूझीलंड अ च्या डावातील ४७ व्या षट्कात कुलदीपने चौथ्या चेंडूवर एक विकेट घेतली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर वॉकरचा उडालेला झेल संजू सॅमसनने टिपला. षट्काच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीपने जेकबला पायचीत पकडत हॅट्‌ट्रिक साधली. या सामन्यात कुलदीपने १० षट‌्कांत ५१ धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स टिपल्या. कुलदीपबरोबरच ऋषी धवन आणी राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. उमरान मलिक आणि राज बावाने प्रत्येकी एक विकेट मिळविली.

हॅट्‌ट्रिकचा बादशहा

कुलदीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील हॅट्‌ट्रिक घेण्याची किमया साधली आहे. कुलदीप यादवने वन-डेमध्ये दोनवेळा हॅट्‌ट्रिक घेतली आहे. २०१७ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कोलकात्यातील वन-डे सामन्यात हॅट्‌ट्रिक केली होती. त्यानंतर त्याने २०१९ मध्येदेखील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात हॅट्‌ट्रिक घेतली होती. कुलदीप यादवने अंडर-१९ पासूनच हॅट्‌ट्रिक घेण्यास सुरुवात केली होती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी