सप्टेंबरमध्ये भारताची अफगाणिस्तानविरुद्ध मालिका; तीन टी-२० सामने खेळणार संग्रहित छायाचित्र | X
क्रीडा

सप्टेंबरमध्ये भारताची अफगाणिस्तानविरुद्ध मालिका; तीन टी-२० सामने खेळणार

सप्टेंबर महिन्यात बांगलादेशमध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळण्याच्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आशा मावळल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १३ ते १७ सप्टेंबरदरम्यान दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळेल, अशी घोषणा केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्यात बांगलादेशमध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळण्याच्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आशा मावळल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १३ ते १७ सप्टेंबरदरम्यान दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळेल, अशी घोषणा केली आहे.

बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (एसीबी) यांनी बुधवारी संयुक्त निवेदनाद्वारे या मालिकेची अधिकृत घोषणा केली. गेल्या वर्षी बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भारत-बांगलादेश द्विपक्षीय मालिका स्थगित करण्यात आली होती. अफगाणिस्तानविरुद्धची ही मालिका एसीबीच्या ‘फ्युचर टूर प्रोग्राम’चा भाग असून, ती अफगाणिस्तानची घरची मालिका मानली जाणार आहे. अफगाणिस्तानमधील राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी भारताला आपले होम ग्राउंड बनवले आहे. या मालिकेतील सर्व तीन सामने दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील.

पहिला सामना १३ सप्टेंबर, दुसरा १५ सप्टेंबर आणि तिसरा सामना १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी जूनमध्ये अफगाणिस्तान संघ ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला होता, तर जानेवारी २०२४ मध्ये दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका झाली होती. तसेच २०१८ मध्ये अफगाणिस्तानने त्यांचा ऐतिहासिक पहिला कसोटी सामना भारतामध्येच खेळला होता.

‘बीसीसीआय’ अध्यक्ष मिथुन मन्हास म्हणाले की, “अफगाणिस्तानमधील क्रिकेटच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळ कटिबद्ध आहे.”

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणणार; महसूलमंत्र्यांचे आदेश; कर्जमाफी, शासकीय योजनांचा मिळणार लाभ

मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेवर 'जीन्सराज'; महामार्गच बनला 'जीन्स सुकवण्याचा अड्डा'!

मुंबईत दरडींची टांगती तलवार! ७४ ठिकाणे धोकादायक तर ४६ ठिकाणे अतिधोकादायक

आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही; कराडमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची गर्जना

मुंबईत नवी सुरुवात करण्याचे स्वप्न भंगले! घाटकोपर दरडीत शेख कुटुंबाचा करुण मृत्यू, चार दिवसांपूर्वीच मुंबईत आलेले कुटुंब उद्ध्वस्त