X
क्रीडा

India at Olympics, Day 7 Full Schedule: मनू भाकर आज पुन्हा 'एक्शन'मध्ये; बघा भारताचे २ ऑगस्टचे वेळापत्रक

पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील सहाव्या दिवशी कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसळेने भारतासाठी ऐतिहासिक कांस्यपदकाचा वेध साधला. मात्र स्वप्निलव्यतिरिक्त अन्य क्रीडा प्रकारांत भारताच्या पदरी निराशा पडली.

Swapnil S

पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील सहाव्या दिवशी कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसळेने भारतासाठी ऐतिहासिक कांस्यपदकाचा वेध साधला. मात्र स्वप्निलव्यतिरिक्त अन्य क्रीडा प्रकारांत भारताच्या पदरी निराशा पडली. बॅडमिंटनमध्ये सात्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी, पी. व्ही. सिंधू यांचा जिव्हारी लागणारा पराभव, बॉक्सिंगमध्ये निखत झरीनला आलेले अपयश, तिरंदाजीत महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवची सुमार कामगिरी आणि हॉकीमध्ये बेल्जियमकडून भारतीय पुरुषांना पत्करावी लागलेली हार यांसारख्या विविध कारणांनी गुरुवारचा दिवस भारतासाठी धक्कादायक ठरला. ऑगस्ट महिन्याची पदकाद्वारे सुरुवात झाली असली तरी उर्वरित १० दिवसांत भारताचे तारे आणखी ७ पदक जिंकून प्रथमच पदकांचे दशक गाठणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. बघूया भारताचे आजचे वेळापत्रक

नेमबाजी

२५ मीटर पिस्तूल महिला पात्रता फेरी

मनू भाकर, इशा सिंग

(दुपारी १२.३० वा.)

स्कीट (पुरुष पात्रता फेरी)

अनंतजीत सिंग

(दुपारी १ वा.)

ॲथलेटिक्स

महिलांची ५००० मीटर शर्यत

अंकिता ध्यानी, पारुल चौधरी

(रात्री ९.३० वा.)

पुरुषांची गोळाफेक (पात्रता फेरी)

तजिंदरपाल सिंग तूर

(रात्री ११.४० वा.)

गोल्फ

पुरुषांची दुसरी फेरी

गगनजीत भुल्लर, शुभांकर शर्मा

(दुपारी १२.३० वा.)

हॉकी

पुरुषांचा पाचवा साखळी सामना

भारत वि. ऑस्ट्रेलिया

(दुपारी ४.४५ वा.)

तिरंदाजी

मिश्र दुहेरी (राऊंड ऑफ ६४)

धीरज व अंकिता

(दुपारी २.३० वा.)

आगेकूच केल्यास राऊंड ऑफ ३२ फेरीतील लढत ३.३० वा.

बॅडमिंटन

पुरुष एकेरी उपांत्यपूर्व फेरी

लक्ष्य सेन वि. चोऊ टिन चेन

(सायंकाळी ६.३० वा.)

ज्युडो

राउंड ऑफ ३२ : तुलिका मान

दुपारी २.१२ वाजता.

नौकानयन

महिला डिंगी शर्यत ३ : नेत्रा कुमनन

दुपारी ३.४५ वाजता.

डिंगी शर्यत ४ : नेत्रा कुमनन :

दुपारी ४.५३ वाजता.

पुरुषांची डिंगी शर्यत ३ : विष्णू सरवणन

संध्याकाळी ७.०५

डिंगी शर्यत ४ : विष्णू सरवण

रात्री ८.१५ वाजता.

संभाजीनगर महापालिकेत महायुती तुटली; शिंदे गट आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपांचे वातावरण

Thane Election : परिवहन मंत्री सरनाईक आणि खासदार म्हस्के यांच्या मुलांचे तिकीट कापले

मीरा-भाईंंदरमध्ये भाजप व शिंदे गट स्वबळावर; जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

ठाण्यात निष्ठावान विरुद्ध ‘आयात’ संघर्ष पेटला; नाराज कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयाची तोडफोड

मीरारोडमध्ये भाजपकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी