चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : बचावात निराशा; तरीही भारत विजयी (Photo-X/@TheHockeyIndia)
क्रीडा

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : बचावात निराशा; तरीही भारत विजयी

कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि आघाडीचा खेळाडू सुखजीत सिंग यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत चीनचा ५-२ असा पराभव केला.

Swapnil S

जालंधर : कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि आघाडीचा खेळाडू सुखजीत सिंग यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत चीनचा ५-२ असा पराभव केला. घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाने गुरुवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

ऑलिम्पियन सुरजीत सिंग हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुखजीतने १२व्या आणि ३४व्या मिनिटाला मैदानी गोल केले. कर्णधार हरमनप्रीतने २७व्या आणि ३१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून गोल नोंदवले. जुगराज सिंगने ४७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

चीनकडून पेंग यांगने २६व्या, तर चोंगकॉन्ग चेनने ३६व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. मात्र, भारतीय संघाचा वेगवान आणि आक्रमक खेळ रोखण्यात चिनी खेळाडूंना अपयश आले.

भारताने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा १३-० असा धुव्वा उडवला होता. दुसरीकडे, चीनला पहिल्या सामन्यात आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाकडून ४-५ असा पराभव स्वीकारावा लागला होता. भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखले. चिनी गोलक्षेत्रात वारंवार प्रवेश करूनही भारतीयांना सुरुवातीला गोलची संधी साधता आली नाही. अखेर १३व्या मिनिटाला जुगराज सिंगने मध्यभागातून दिलेल्या अचूक उंच पासवर सुखजीतने चेंडूवर नियंत्रण मिळवले आणि चिनी गोलरक्षकाला चकवत भारताचे खाते उघडले.

चीनने १८व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, मात्र भारतीय बचावफळीने हा प्रयत्न हाणून पाडला. भारतालाही सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्याचा फायदा घेता आला नाही.

आज जपानशी लढत

भारताचा पुढील सामना शुक्रवारी जपानविरुद्ध होणार आहे, तर चीनचा सामना दक्षिण कोरियाशी होईल. जपाननेदेखील दोन्ही साखळी लढती जिंकलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांत कडवी झुंज अपेक्षित आहे. नागोया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने जपानला २-० असे नमवले होते. भारताने सर्वाधिक पाच वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे, हे विशेष.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; नेरळ-माथेरान 'मिनी ट्रेन' आजपासून पुन्हा धावणार, बघा वेळापत्रक

मतवारी दुष्काळाची! पर्यावरण मतपेटीत कधी उतरणार? दुष्काळमुक्तीसाठी राजकीय इच्छाशक्ती आणि मतदारांच्या जागरूकतेची गरज

कचरा टाकणाऱ्यांना ‘एआय’ कॅमेऱ्याची तंबी; मुंबई मनपाचा उपक्रम, कचरा इतरत्र टाकताच स्वच्छतेचा संदेश मिळणार

मुंबईसह आठ शहरांत रेल्वेची डोअरस्टेप पार्सल सेवा; खासगी लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या मदतीने घरपोच पार्सलची सुविधा

Mumbai : नव्याने मुद्रांक शुल्कास मज्जाव; उच्च न्यायालयाचा निकाल