क्रीडा

भारताच्या कर्णधाराने भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला

बुमराहने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत आतापर्यंत २१ विकेट्स घेतल्या आहेत.

वृत्तसंस्था

गतवर्षाच्या इंग्लंड दौऱ्यात स्थगित झालेल्या पाचव्या पुनर्नियोजित कसोटीत सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात तीन विकेट घेताच भारताचा काळजीवाहू कर्णधार जसप्रीत बुमराहने भुवनेश्वर कुमारने २०१४ मध्ये केलेला विक्रम मोडला.

बुमराहने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत आतापर्यंत २१ विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी भुवनेश्वरने २०१४ मध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १९ विकेट‌्स घेतल्या होत्या. रोहितच्या अनुपस्थितीत संघाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला हा विक्रम आणखी पुढे नेण्यास मोठा वाव आहे. भारताकडून इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या पाच जणांच्या यादीत फक्त एका फिरकीपटूचा समावेश आहे. लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांनी १९५९ मधील दौऱ्यात पाच सामन्यात १७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांनी ३४.६४ च्या सरासरीने या विकेट्द घेतल्या होत्या, तर २.९४ प्रती षटके सरासरीने धावा दिल्या होत्या.

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

GST दर कपातीनंतर NCH ला तीन हजार तक्रारी प्राप्त; ग्राहक व्यवहार सचिवांची माहिती