क्रीडा

Paralympic Games Paris 2024: पॅरालिम्पिकमध्ये भारताला २५ पदके अपेक्षित

Paris Paralympic Games: २८ ऑगस्टपासून रंगणाऱ्या पॅरालिम्पिक (अपंगांच्या) क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून २५ पदके अपेक्षित आहेत. भारतीय पॅरालिम्पिक समितीचे (पीसीआय) अध्यक्ष देवेंद्र झझारिया यांनीही यासंबंधी आशावाद व्यक्त केला.

Swapnil S

नवी दिल्ली : २८ ऑगस्टपासून रंगणाऱ्या पॅरालिम्पिक (अपंगांच्या) क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून २५ पदके अपेक्षित आहेत. भारतीय पॅरालिम्पिक समितीचे (पीसीआय) अध्यक्ष देवेंद्र झझारिया यांनीही यासंबंधी आशावाद व्यक्त केला.

यंदा भारताचे ८४ खेळाडू पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरले असून पॅरिसमध्येच ही स्पर्धा होणार आहे. २०२०च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना १९ पदके जिंकली होती. त्यामध्ये ५ सुवर्ण, ८ रौप्य व ६ कांस्यपदकांचा समावेश होता.

“यंदा भारताचे प्रथमच ८४ खेळाडूंचे मोठे पथक पॅरालिम्पिकसाठी दाखल झाले आहेत. भारताचे खेळाडू किमान २५ पदक जिंकण्यात यशस्वी होतील, अशी आशा आहे. १२ प्रकारांत आपले खेळाडू सहभागी होणार असून यामध्ये बॅडमिंटन, तिरंदाजी, ॲथलेटिक्स, सायकलिंग, कॅनोइंग, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, तायक्वांदो असे खेळ आहेत,” असे झझारिया म्हणाले.

Navi Mumbai : खारघरमधील भूखंडाला सर्वाधिक बोली; सेंट्रल पार्कलगतचा प्लॉट तब्बल २१०० कोटींना

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

निवडणुकीच्या तोंडावर सरकारला गरीबांची आठवण; 'शिवभोजन थाळी'ची पुन्हा घेता येणार चव; २८ कोटींचा निधी उपलब्ध

मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न; आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक

Mumbai : सर्व मेट्रो संस्थांच्या एकत्रीकरणासाठी समिती; ३ महिन्यांत अहवाल शासनास करणार सादर