X
क्रीडा

२७ वर्षांनी टीम इंडियावर नामुष्की! श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली

१९९७ नंतर म्हणजेच तब्बल २७ वर्षांनी टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम चारीथ असलंकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या संघाने केला

Swapnil S

कोलंबो : अविष्का फर्नांडोच्या ९६ धावांच्या मॅरेथॉन खेळीसह दुनीथ वेल्लेलेजने शानदार गोलंदाजी करत बुधवारी टीम इंडियाला दारूण पराभवाचा धक्का दिला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यातील विजयामुळे श्रीलंकेने २-० ने मालिका खिशात घातली. १९९७ नंतर म्हणजेच तब्बल २७ वर्षांनी टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम चारीथ असलंकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या संघाने केला.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या भारताची दुनीथ वेल्लेलेज समोर घसरगुंडी झाली. कर्णधार रोहित शर्माने ३५ धावा जमवत थोडा फार प्रतिकार केला. मात्र भारताच्या अन्य फलंदाजांनी अगदीच निराशा केली. संघाला लागलेली गळती शेवटपर्यंत रोखता आली नाही. तळात वॉशिंग्टन सुंदरने ३० धावांची भर घालत पराभवाचे अंतर थोडे फार कमी केले. २६.१ षटकांत अवघ्या १३८ धावांवर भारताचा संघ गारद झाला. दुनीथ वेल्लेलेजने भारताच्या ५ फलंदाजांना माघारी धाडले.

कोलंबोच्या संथ खेळपट्टीवर यजमानांनी सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पथुम निसांका आणि अविष्का फर्नांडो या सलामीच्या जोडगोळीने संयमी फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची परिक्षा घेतली. धावसंख्येचा वेग काहीसा कमी असला तरी त्यांनी विकेट विचविण्यावर भर दिला. या जोडीने श्रीलंकेला ८९ धावांची सलामी भागीदारी करून दिली. त्यानंतर अविष्का फर्नांडोने ९६ आणि कुसल मेंडिसने ५९ धावा करत श्रीलंकेला २४८ धावा जमवून दिल्या. भारताच्या रियान परागने ३ विकेट्स मिळवल्या.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक