क्रीडा

भारताचा चीनकडून पराभव; आज उपांत्यपूर्व फेरीत पुरुषांची जपान, महिलांची हाँगकाँगशी गाठ

Swapnil S

शाह आलम (मलेशिया) : भारतीय पुरुष संघाला गुरुवारी आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात चीनकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. मात्र यानंतरही भारतीय पुरुषांनी उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केलेले आहे. आता शुक्रवारी उपांत्यपूर्व सामन्यात पुरुषांची जपानशी, तर भारतीय महिलांची हाँगकाँगशी गाठ पडेल.

मलेशिया येथे सुरू असलेली ही स्पर्धा ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीने मोलाची आहे. बुधवारी भारताच्या दोन्ही संघांनी आपापले सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. मात्र गुरुवारी अ-गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात भारतीय पुरुषांना चीनकडून परभवाला सामोरे जावे लागले. एच. एस. प्रणॉय व लक्ष्य सेन यांनी आपापल्या लढती जिंकल्या. मात्र अन्य तीन फेऱ्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला.

प्रणॉयने वेंग हाँगला ६-२१, २१-१८, २१-१९ असे तीन गेममध्ये नमवले. लक्ष्यने ली लॅन झीवर २१-११, २१-१६ अशी मात केली. मात्र पुरुष दुहेरीत एम. आर. अर्जुन व ध्रुव कपिला यांना चेन बो व ल्यू यी यांच्याकडून १५-२१, २१-१९, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. तसेच एकेरीत चिराग सेन वँग झेंगकडून १५-२१, १६-२१ असा हरला. मग निर्णायक पाचव्या लढतीत सूरज गोला व पृथ्वी कृष्णमूर्ती यांचाही पराभव झाला. भारताने या लढतीसाठी किदाम्बी श्रीकांत व सात्त्विक-चिराग यांना विश्रांती दिली होती. शुक्रवारी पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीवर महिला संघाची भिस्त असेल.

उपांत्यपूर्व फेरी

महिला : भारत वि. हाँगकाँग

वेळ : सकाळी ७.३० वाजता

पुरुष : भारत वि. जपान

वेळ : दुपारी १.३० वाजता

थेट प्रक्षेपण : आशियाई स्पर्धेची अधिकृत यूट्यूब वाहिनी

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलावर कारवाई होणार का? पुणे अपघातावर काय म्हणाले फडणवीस?

धक्कादायक! बारावीत ८७ टक्के गुण, तरीही केली आत्महत्या... कमी टक्केवारी मिळाल्यानं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

जेवणावरून झाला वाद अन् मित्रावरचं केला कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक 

मुंबईत संथ मतदान का? मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिले चौकशीचे आदेश

Pune Porsche crash: "पोलिसांवर दबाव आणला नाही, मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात"; राष्ट्रवादीच्या आमदाराचं स्पष्टीकरण