न्यूझीलंड संघात फिन ॲलन, लॉकी फर्ग्युसनचे पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी किवी संघाची घोषणा (Photo-X)
क्रीडा

न्यूझीलंड संघात फिन ॲलन, लॉकी फर्ग्युसनचे पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी किवी संघाची घोषणा

भारताविरुद्ध आगामी ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली असून, संघ दोन टप्प्यांत विभागण्यात आला आहे.

Swapnil S

वेलिंग्टन : भारताविरुद्ध आगामी ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली असून, संघ दोन टप्प्यांत विभागण्यात आला आहे. या मालिकेत फिन ॲलन, लॉकी फर्ग्युसन आणि टीम सेईफर्ट हे खेळाडू न्यूझीलंडच्या एकदिवसीय संघात पुनरागमन करत आहेत, तर खांद्याच्या दुखापतीतून सावरून रचिन रवींद्र देखील संघात परतला आहे.

या मालिकेदरम्यान कसोटी सामने होणार असल्यामुळे निवडकर्त्यांनी विभागलेला संघ निवडला असून, कसोटी तज्ज्ञ खेळाडू तिसऱ्या सामन्यानंतर संघातून रिलीज केले जाणार आहेत. न्यूझीलंडच्या निवडकर्त्यांनी संघाची तीन गटांत विभागणी केली आहे, ज्यामध्ये केवळ सहा खेळाडू म्हणजेच कर्णधार मिचेल सान्तनेर, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, जेकब डफी, विल यंग आणि ब्लेअर टिकनर हे सर्व पाच एकदिवसीय सामन्यांसाठी संघात कायम राहणार आहेत.

ऑकलंडमधील ईडन पार्क येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यापासून सुरू होणाऱ्या पहिल्या तीन सामन्यांसाठी डेव्हन कॉनवे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र आणि नॅथन स्मिथ हे खेळाडू खेळणार आहेत. तिसऱ्या सामन्यानंतर हे सर्व कसोटी तज्ज्ञ खेळाडू वेलिंग्टन येथे लांब स्वरूपाच्या फॉरमॅटची तयारी करण्यासाठी संघ सोडणार आहेत.

शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमधील रिक्त जागा भरण्यासाठी फिन ॲलन, ख्रिस्तियन क्लार्क, मॅट फिशर, लॉकी फर्ग्युसन, मिच हे, निक केली आणि टीम सेईफर्ट या सात अतिरिक्त खेळाडूंचा संघात समावेश केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक रॉब वाल्टर यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या २०२७ मधील आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे.

न्यूझीलंडचा वनडे संघ

पहिले तीन सामने : मिचेल सान्तनेर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉनवे, जेकब डफी, मॅट हेन्री, कायले जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, ब्लेअर टिकनर, विल यंग.

चौथा आणि पाचवा सामना : मिचेल सान्तनेर (कर्णधार), फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, ख्रिस्तियन क्लार्क, जेकब डफी, मॅट फिशर, लॉकी फर्ग्युसन, मिच हे, निक केली, टीम सेइफर्ट, ब्लेअर टिकनर, विल यंग.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर उभारणार अत्याधुनिक बायो टॉयलेट; पालिका करणार ४ कोटी १९ लाख रुपये खर्च

भ्रष्ट कारभाराने निसर्गाची कत्तल; ठाणेकर उकाड्यात, यंत्रणा एसीत सुस्त; पारा ३८ अंशांवर, मध्यरात्रीही उष्णतेचा तडाखा

Mumbai : कमी कालावधीच्या सिग्नलमुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

मध्य रेल्वेची मालवाहतुकीतून ४,११७ कोटींची कमाई

Mumbai : ‘पार्टिसिपेट मुंबई’मुळे पालिकेला फायदा होणार का?