डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : भारतासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान 
क्रीडा

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : भारतासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान

डेव्हिस कप क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीत दक्षिण कोरियाने भारताचे यजमानपद स्वीकारले असून ही लढत सेऊल येथील ऑलिम्पिक टेनिस सेंटरमध्ये हार्डकोर्टवर रंगणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: डेव्हिस कप क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीत दक्षिण कोरियाने भारताचे यजमानपद स्वीकारले असून ही लढत सेऊल येथील ऑलिम्पिक टेनिस सेंटरमध्ये हार्डकोर्टवर रंगणार आहे.

१८ आणि १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सामन्यात दोन तुल्यबळ संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या डेव्हिस कप क्रमवारीत भारत १९ व्या तर दक्षिण कोरिया १६ व्या स्थानावर आहे. परस्पर सामन्यांच्या नोंदीत कोरियाकडे ६-५ अशी किरकोळ आघाडी आहे. या महत्त्वपूर्ण लढतीसाठी भारतीय संघाची निवड १० ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

या दोन्ही देशांमध्ये आठ वर्षांनंतर सामना होत आहे. यापूर्वी २०१६ मध्ये चंडीगड येथे हिरवळीवर खेळवलेल्या आ शिय / ओ श निया गट-१ च्या लढतीत भारताने ४-१ असा विजय मिळवला होता. कोरियन खेळाडू सहसा हार्डकोर्ट खेळण्यास अधिक पसंती दर्शवतात, म्हणूनच गेल्या वेळी भारताने ग्रास कोर्टची निवड केली होती.

भारताने फेब्रुवारी महिन्यात बंगळुरू येथे नेदरलँड्सवर ३-२ अशी नाट्यमय मात केली होती.

भारत पहिल्यांदाच दुसऱ्या फेरीत

२०१९ मध्ये सध्याचे स्वरूप लागू झाल्यापासून भारताने पहिल्यांदाच क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. ही दुसरी फेरी म्हणजे 'फायनल ८ 'मधील स्थानासाठी 'करो किंवा मरो' अशी लढत असणार आहे. यातील विजेता संघ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या 'फायनल ८' मध्ये प्रवेश करेल. दक्षिण कोरियाने २०२२ आणि २०२३ मध्ये १६ संघांच्या डेव्हिस कप फायनल्समध्ये प्रवेश केला होता.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क न घेण्याच्या राज्य मंडळाच्या सूचना

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल