Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर, जसप्रीत बुमराहला संधी संग्रहित छायाचित्र
क्रीडा

Team India Champions Trophy Squad : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर, जसप्रीत बुमराहसह शमीचा समावेश

प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्मा कर्णधार तर एस गिल उपकर्णधार असणार आहे. विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, एम शमी, अर्शदीप, वाय जयस्वाल , आर पंत आणि आर जडेजा यांचा संघात समावेश

Kkhushi Niramish

प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्मा कर्णधार तर एस गिल उपकर्णधार असेल. विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, एम शमी, अर्शदीप, वाय जयस्वाल , आर पंत आणि आर जडेजा यांना संघात स्थान मिळाले आहे. एएनआय वृत्त संस्थेने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून याची माहिती दिली आहे.

१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. ८ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दोन गट करण्यात आले आहेत. भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. भारतीय संघ अनुक्रमे २० व २३ फेब्रुवारी रोजी बांगलादेश व पाकिस्तानविरुद्ध साखळी लढत खेळणार आहे. त्यानंतर २ मार्चला भारताची न्यूझीलंडशी गाठ पडेल.

जसप्रीत बुमराह खेळणार

३१ वर्षीय बुमराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत अवघ्या १३.०६च्या सरासरीने तब्बल ३२ बळी मिळवले. बुमराने या मालिकेत १५०हून अधिक षटके गोलंदाजी केली. भारताने ही मालिका १-३ अशी गमावली. मात्र बुमराच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सिडनी येथील पाचव्या कसोटीत बुमरा भारताचे कर्णधारपद भूषवत होता. मात्र पाठदुखीमुळे दुसऱ्या डावात बुमरा गोलंदाजीसाठी आला नाही. पहिल्या डावातच गोलंदाजीच्या वेळेस त्याची पाठ दुखू लागल्याने स्टेडियम सोडून तो स्कॅन करण्यासही गेला होता.

सध्याच्या माहितीनुसार बुमराची पाठदुखी ग्रेड-२ किंवा ग्रेड-३ स्वरूपातील असल्याचे समजते. त्यामुळे तो थेट फेब्रुवारीच्या अखेरीस खेळण्यासाठी उपलब्ध असू शकतो. या स्थितीत बुमराचा संघात समावेश करण्यात येणार की नाही, हा चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, निवड समितीने बुमराहवर विश्वास टाकत त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी पाऊल पडते पुढे

जुलै महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'