क्रीडा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर बाहेर

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मंडळाच्या मुंबईतील बैठकीनंतर राहुल कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती.

वृत्तसंस्था

येत्या शुक्रवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार असतानाच भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर या मालिकेत खेळू शकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुलला सहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

गेल्या आठवड्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मंडळाच्या मुंबईतील बैठकीनंतर राहुल कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. राहुलने आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे, परंतु ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या डॉक्टरांनी त्याला आणखी एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडिजला रवाना होऊ शकलेला नाही.

जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेआधीच राहुल जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर जर्मनीमध्ये शस्रक्रिया करण्यात आली होती. शस्रक्रिया झालेल्या राहुलने भारतात परतल्यानंतर जोरदार सराव सुरू केला होता. बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करतानाचे त्याचे व्हिडीओ समोर आले होते. या सरावासाठी त्याने महिला गोलंदाज झुलन गोस्वीमाचीही मदत घेतली होती.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस