क्रीडा

चालण्याच्या शर्यतीत भारताचा राम बाबू ऑलिम्पिकसाठी पात्र

ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या १ तास, २० मिनिटे, १० सेकंद या वेळेपूर्वीच त्याने ही शर्यत पूर्ण केली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा राम बाबू २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. स्लोव्हाकिया येथे झालेल्या स्पर्धेत राम बाबूने १ तास आणि २० मिनिटांमध्ये २० किलोमीटर हे अंतर पार केले. या शर्यतीत तो तिसऱ्या स्थानावर राहिला. मात्र ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या १ तास, २० मिनिटे, १० सेकंद या वेळेपूर्वीच त्याने ही शर्यत पूर्ण केली.

दरम्यान, गुलवीर सिंगने पुरुषांच्या १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत १६ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्र मोडीत काढला. कॅलिफोर्नियामध्ये सुरू असलेल्या अन्य स्पर्धेत २५ वर्षीय गुलवीरने २७ मिनिटे, ४१.८१ सेकंद या वेळेत १० हजार मीटर हे अंतर पूर्ण केले. यापूर्वी २००८मध्ये सुरेंद्र सिंगने २८ मिनिटे, ०२.८९ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली होती. मात्र गुलवीर या विक्रमानंतरही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही. ऑलिम्पिकसाठी त्याला २७ मिनिटांत ही शर्यत पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र गुलवीरने त्यासाठी ४१ सेकंद अतिरिक्त घेतले.

BMC निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचितचं ठरलं! दोन्ही पक्षांची युती जाहीर, जागावाटपही निश्चित

Mumbai : १० कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठा खुलासा; २ महिलांना पोलीस कोठडी, मराठी अभिनेत्रीचाही सहभाग

"धमकीची माहिती देऊनही..." ; खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्याप्रकरणी नातेवाईकांचा गंभीर आरोप

खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

'पटक पटक के मारुंगा…' एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टला जाणाऱ्या प्रवासी महिलेला ऑटोचालकाकडून धमकी; Video व्हायरल