क्रीडा

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि मेडिसन किज यांचा उपांत्य फेरीत पराभव

सानिया मिर्झाने तब्बल सात वर्षांनंतर टोरंटो ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता

वृत्तसंस्था

टोरंटो ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची सहकारी मेडिसन किज यांना जेसिका पेगुला आणि कोको ग्राफ जोडीकडून ५-७, ५-७ असा पराभव पत्करावा लागला.

सानिया मिर्झाने तब्बल सात वर्षांनंतर टोरंटो ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तिने आपली सहकारी मेडिसन किजसोबत दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात चित्तथरारक लढतीत सोफिया केनिन, युलिया पुतिंतसेवा यांच्यावर ७-५, ३-६, १०-६ ने विजय मिळविला होता.

माजी किताब विजेत्या सानियाने २०१५ नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. यापूर्वी तिने २०१४ मध्ये झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसोबत उपांत्य फेरी गाठली होती. हीच लय कायम ठेवत या जोडीने विजेतेपद मिळविले होते. मात्र, त्यानंतर २०१५ मध्ये या जोडीला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

सरम्यान, चेक गणराज्यची कॅरोलिना प्लिसकोवा, ब्राझीलची ब्रिट्रिज यांनी महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. स्विसच्या बेलिंडा बेनकिचला पराभव पत्करावा लागला. ब्राझीलच्या ब्रिट्रिजने बेलिंडावर २-६, ६-३, ६-३ ने मात केली.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला