क्रीडा

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टिंग खेळाडूंचा जबरदस्त दबदबा ; लव्हप्रीत सिंगने पटकावले कांस्यपदक

लव्हप्रीत सिंगने स्नॅचमध्ये १६३ किलो, तर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १९२ किलो वजन उचलले

वृत्तसंस्था

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय वेटलिफ्टिंगपटू लव्हप्रीत सिंगने १०९ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकाविले. भारताचे हे वेटलिफ्टिंगमधील नववे पदक ठरले. या स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी जबरदस्त दबदबा निर्माण केला आहे.

लव्हप्रीत सिंगने स्नॅचमध्ये १६३ किलो, तर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १९२ किलो वजन उचलले. त्याने एकूण ३५५ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकाविले. कॅमेरूनच्या ज्युनियर पेरिस्लेक्सने ३६१ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले; तर सामोनच्या जॅक हिटिला याने एकूण ३५८ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले.

लव्हप्रीतने सर्व सहा प्रयत्नांमध्ये अतिशय सराईतपणे खेळ केला. स्नॅचमध्ये त्याने पहिल्या प्रयत्नात १५७ किलो वजन उचलले, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात अनुक्रमे १६१ आणि १६३ किलो वजन उचलले. यानंतर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये त्याने पहिल्या प्रयत्नात १९६ किलो वजन उचलले. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात १८९ आणि १९२ किलो वजन उचलले.

भारतीय वेटलिफ्टिंगपटूंपैकी मीराबाई चानू, जेरेमी लालरिन्नुगा आणि अचिंता शेऊली यांनी सुवर्णपदक पटकाविले. संकेत महादेव सरगर, बिंदियाराणी देवी आणि विकास ठाकूर यांनी रौप्यपदक मिळविले. गुरुराजा ठाकूर, हरजिंदर कौर आणि लव्हप्रीत सिंग यांनी कांस्यपदक मिळविले.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले