क्रीडा

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या 'या' खेळाडूने पटकावले विजेतेपद

महिला एकेरीत भारताच्या रुत्विका गाडेला जपानच्या मिहो कायामाकडून पराभव पत्करावा लागला.

वृत्तसंस्था

भारताच्या मैस्नम मैराबाने रविवारी नागपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याशिवाय पुरुष दुहेरीत भारताच्या एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीने जेतेपदावर नाव कोरले.

१९ वर्षीय चौथ्या मानांकित मैस्नमने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्याच दुसऱ्या मानांकित मिथुन मंजुनाथवर २१-१४, २१-१६ अशी सरळ दोन गेममध्ये ४२ मिनिटांत मात केली. प्रकाश पदुकोण अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या मैस्नमचे हे वर्षातील दुसरे जेतेपद ठरले. त्याने फेब्रुवारीमध्ये इराण येथील स्पर्धाही जिंकली होती.

महिला एकेरीत भारताच्या रुत्विका गाडेला जपानच्या मिहो कायामाकडून पराभव पत्करावा लागला. मिहोने रुत्विकाला २१-११, २१-११ अशी धूळ चारली. पुरुष दुहेरीत अर्जुन-ध्रुव यांनी थायलंडच्या कॅमलिन आणि याँगशे यांच्यावर २१-१७, २०-२२, २१-१८ अशी सरशी साधली. त्यांचे हे वर्षातील पहिलेच जेतेपद ठरले. मिश्र दुहेरीत भारताच्या के. एम. मनीषा आणि शेख गोस यांना मात्र अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

...त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा

BMC Election: मुंबईत NCP शरद पवार गटाचे काँग्रेसला टाळून मार्गक्रमण?

निवडणुका वेळेत होणार; निवडणूक अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढणार - राज्य सरकारचा निर्णय

BMC Election : मुंबईकरांनो, तुमचा परिसर कोणत्या प्रभागात येतो?

आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार; जाणून घ्या महालक्ष्मी व्रत उद्यापनाचे संपूर्ण नियम व विधी