क्रीडा

IPL 2023 : मिनी लिलाव ठरला 'मेगा लिलाव' ; एक-दोन नव्हे तर ४ रेकॉर्ड ब्रेक बोली

आयपीएल २०२३चा (IPL 2023) मिनी लिलाव खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला, कारण ४ खेळाडूंवर लागली १५ कोटींहून अधिक बोली

प्रतिनिधी

कोची येथे झालेल्या आयपीएल २०२३च्या (IPL 2023) मिनी लिलावकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष होते. कारण, यामध्ये तब्बल ४०५ खेळाडूंवर बाेली लागणार होती. तसेच, बऱ्याच मोठ्या चेहऱ्याचा या लिलावामध्ये समावेश होता. लिलाव सुरु झाला आणि अगदी काहीच वेळामध्ये सॅम करनवर बोली लावण्यात आली. सर्व संघांमध्ये बोली लावण्यासाठी चढाओढ सुरु झाली आणि यामध्ये पंजाब किंग्सने बाजी मारत त्याला १८.५० कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. ही आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम बोली ठरली. त्यामुळे सॅम करन हा आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

याच लिलावामध्ये दुसरा सर्वात महागडा खेळाडू होण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनला मिळाला. पहिल्यांदाच आयपीएल खेळात असलेल्या कॅमेरून ग्रीनवर १७.५० कोटींची बोली लागली. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात दुसरी सर्वाधिक बोली लावत कॅमेरून ग्रीनचा कॅमेरून आपल्या संघात समावेश केला.

तर, त्यानंतर इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर १६.२५ कोटी रुपयांची सर्वोत्तम बोली लागली. याआधी त्याच्यावर २०१७मध्ये १४.५० कोटी बोली लावण्यात आली होती. चेन्नई सुपर किंग्सने विकत घेतले असून भारतीय खेळाडू अजिंक्य रहाणे ५० लाखांमध्ये विकत घेतले. त्यामुळे पूर्वाश्रमीची पुणे संघाची तिकडी बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे आणि महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा एकत्र एकाच संघासाठी खेळताना दिसणार आहेत.

वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक निकोलस पूरनला १६ कोटींमध्ये विकत घेत हैदराबाद संघाने आपल्या ताफ्यात सामील केले. यापूर्वी यष्टीरक्षक म्हणून मुंबईच्या ईशान किशनला १५.२५ कोटींची बोली लागली होती.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

एकनाथ शिंदे अडचणीत; बेकायदा इमारतींना अभय दिल्याचा आरोप, उच्च न्यायालयात याचिका दाखल

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य