क्रीडा

कोलकाताचा विजयरथ रोखण्याचे चेन्नईचे ध्येय

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलतानाने आतापर्यंत हैदराबाद, बंगळुरू आणि दिल्ली या संघांना धूळ चारली आहे. गौतम गंभीरचे मार्गदर्शन या संघासाठी लाभदायी ठरत आहे. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडच्या चेन्नई संघाने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर दिल्ली आणि हैदराबादकडून पराभव पत्करले.

Swapnil S

चेन्नई : आयपीएलमध्ये सोमवारी होणाऱ्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत सलग तीन विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या कोलकाताला रोखण्याचे आव्हान चेन्नईपुढे असेल.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलतानाने आतापर्यंत हैदराबाद, बंगळुरू आणि दिल्ली या संघांना धूळ चारली आहे. गौतम गंभीरचे मार्गदर्शन या संघासाठी लाभदायी ठरत आहे. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडच्या चेन्नई संघाने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर दिल्ली आणि हैदराबादकडून पराभव पत्करले. त्यामुळे चार सामन्यांतील दोन विजय व दोन पराभवांसह चेन्नईचा संघ संघर्ष करत आहे. मात्र घरच्या मैदानावर परतल्यामुळे त्यांना कामगिरी उंचावण्यासाठी योग्य संधी आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांत कडवी झुंज अपेक्षित आहे.

ऋतुराजचा संघर्ष, धोनी लयीत

ऋतुराजला या स्पर्धेत अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे मधल्या फळीवर दडपण येत आहे. महेंद्रसिंह धोनीने फटकेबाजीद्वारे लयीत असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र अजिंक्य रहाणे, डॅरेल मिचेल, रवींद्र जडेजा यांना मधल्या षटकांत धावगती वाढवणे गरजेचे आहे. गोलंदाजीचा विचार करता मुस्तफिझूर रहमानबाबत संभ्रम कायम आहे. व्हिसाच्या कारणास्तव रहमान बांगलादेशला मागारी परतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुकेश चौधरी, दीपक चहर व मथीशा पाथिराना वेगवान बाजू सांभाळतील, तर महीष थिक्षणा व मोईन अली फिरकीची धुरा वाहतील. मोईनला फलंदाजीत वरच्या स्थानी बढती मिळू शकते.

नरिन, रसेलपासून धोका

कोलकाताचा सुनील नरिन सध्या भन्नाट फॉर्मात असून गेल्या दोन लढतींत त्याने एकहाती कोलकाताला बाजी मारून दिली. त्याशिवाय आंद्रे रसेलही लयीत असून सलामीवीर फिल सॉल्ट सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. वेंकटेश व श्रेयस या अय्यर दुकलीकडून कोलकाताला मोठी खेळी अपेक्षित आहे. रिंकू सिंग अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यात पटाईत आहे. चेन्नईची खेळपट्टी काहीशी संथ असल्याने येथे फिरकीपटू किफायतशीर ठरू शकतात. त्यामुळे वरुण चक्रवर्ती व नरिन ही जोडी चेन्नईसाठी धोकादायी ठरू शकते. तसेच सुयश शर्माचा पर्यायही कोलकाताकडे उपलब्ध आहे.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे