क्रीडा

IPL 2025 : एवढ्या मोठ्या लेव्हलला खेळण्याचा विचारही केला नव्हता; मुंबई इंडियन्सचा गोलंदाज विघ्नेश पुथूरचे उद्गार

जीवनात मी कधीही विचार केला नव्हता की मी या सर्व खेळाडूंसोबत खेळेन, अशा शब्दांत मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Swapnil S

मुंबई : जीवनात मी कधीही विचार केला नव्हता की मी या सर्व खेळाडूंसोबत खेळेन, अशा शब्दांत मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने आपल्या भावना व्यक्त केल्या. रविवारी चेन्नईविरुद्ध सलामीची लढत मुंबईने गमावली. या सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये पुथूर बोलत होता.

२४ वर्षीय फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण करताना तीन विकेट्स घेण्याची कामगिरी केली. केरळच्या मलप्पुरममधील या गोलंदाजाने आपल्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याची घरची परिस्थिती हलाखीची. हा खेळाडू यंदा आयपीएलमध्ये खेळत आहे.

शनिवारी रात्री विघ्नेशने मला कॉल करून सांगितले की, रविवारी त्याला खेळण्याची संधी मिळणार आहे. आम्ही या सामन्याचा प्रत्येक बॉल पाहत होतो, असे पुथूरची आई बिंदू म्हणाल्या.

आम्ही खूप खुश आहोत

आम्ही कधीही विचार केला नव्हता की विघ्नेश पहिल्याच मॅचमध्ये खेळेल. आम्ही खूप खुश आहोत. आम्ही विचार देखील केला नव्हता की त्याला आयपीएलचा करार मिळेल. आता खूप लोक आम्हाला अभिनंदन करण्यासाठी कॉल करत आहेत, असे पुथूरचे वडील सुनील कुमार म्हणाले.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर