एक्स @Uk__0007
क्रीडा

IPL 2025 - LSG vs DC : राहुल, मुकेशमुळे दिल्लीचे लखनऊवर सहज वर्चस्व

एडीन मार्करम (३३ चेंडूंत ५२ धावा) आणि मिचेल मार्श (३६ चेंडूंत ४५) यांनी लखनऊ सुपर जायंट्ससाठी धडाकेबाज सुरुवात केली.

Swapnil S

लखनऊ : एडीन मार्करम (३३ चेंडूंत ५२ धावा) आणि मिचेल मार्श (३६ चेंडूंत ४५) यांनी लखनऊ सुपर जायंट्ससाठी धडाकेबाज सुरुवात केली. मात्र त्यानंतर मध्यमगती गोलंदाज मुकेश कुमारने ३३ धावांत ४ बळी मिळवले. त्यामुळे मंगळवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सची २० षटकांत ६ बाद १५९ अशी घसरगुंडी उडाली. त्यानंतर के. एल. राहुलने ४२ चेंडूंत नाबाद ५७ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्यामुळे दिल्लीने हे लक्ष्य १७.५ षटकांत गाठून ८ गडी राखून विजय मिळवला.

इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून लखनऊला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र मार्श व मार्करम यांनी १० षटकांत ८७ धावांची सलामी नोंदवून दिल्लीचा निर्णय चुकीचा ठरवला. मार्करमने २ चौकार व ३ षटकारांसह हंगामातील चौथे अर्धशतक साकारले, तर मार्शने ४५ धावांचे योगदान दिले. अखेरीस दुश्मंता चमीराने मार्करमचा अडसर दूर केला. तेथून मग लखनऊची फलंदाजी ढेपाळली. मिचेल स्टार्कने धोकादायक निकोलस पूरनचा (९) त्रिफळा उडवला. तर १४व्या षटकात मुकेशने अब्दुल समद (२) व मार्शला माघारी पाठवले. त्याने मार्शला टाकलेला यॉर्कर चेंडू अप्रतिम होता. त्यानंतर आयुष बदोनी (३६) व डेव्हिड मिलर (नाबाद १४) यांना फटकेबाजी करता आले नाही. हाताच्या दुखापतीमुळे पंत सातव्या स्थानी फलंदाजीला आला. मात्र मुकेशने पंत व बदोनीला अखेरच्या षटकात बाद केले.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन