क्रीडा

IPL 2025 : नव्या कर्णधारांच्या कामगिरीवर नजरा; दिल्लीसमोर लखनऊचे आव्हान

नव्या कर्णधारासह दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ परस्परातील लढतीने सोमवारी आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात करणार आहेत.

Swapnil S

विशाखापटणम : नव्या कर्णधारासह दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ परस्परातील लढतीने सोमवारी आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात करणार आहेत. दोन्ही संघांत बरेच फेरबदल झाले असून स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.

ऋषभ पंतने दिल्लीचे नेतृत्वपद सांभाळले आहे. मात्र गत वर्षी झालेल्या लिलावाच्या आधी दिल्लीने त्याला मुक्त केले. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने त्याच्यावर २७ करोड रुपयांची विक्रमी बोली लावत आपल्या ताफ्यात घेतले. पंतच्या कामगिरीवर चाहत्यांच्या नजरा आहेत. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत पंतला खेळण्याची संधी मिळाली नाही.

दुसरीकडे केएल राहुलने दोन वर्षे लखनऊचे कर्णधारपद सांभाळले आहे. यंदाच्या हंगामात तो दिल्लीकडून खेळताना दिसेल. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलकडे दिल्लीच्या संघाचे नेतृत्व सोपवले आहे. फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही आघाड्यांवर तो संघाला उपयुक्त ठरू शकतो.

मुंबई इंडियन्ससारखे दिल्लीकडेही कर्णधारपदासाठी पर्याय होते. दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसिससह राहुल असे अनुभवी खेळाडू त्यांच्या संघात आहेत. मात्र फ्रँचायझीने कर्णधारपदासाठी अष्टपैलू अक्षर पटेलवर विश्वास दाखवला.

भारतीय आणि परदेशी खेळाडूंना समतोल साधून लखनऊच्या विजयासाठी प्रयत्न करावे लागतील.

प्रतिस्पर्धी संघ

दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम.

लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), रवी बिश्नोई, आयुष बदोनी, मयांक यादव, निकोलस पूरन, मोहसिन खान, अब्दुल समद, एडीन मार्करम, आकाश दीप, अर्शीन कुलकर्णी, आर्यन जुयाल, आवेश खान, डेव्हिड मिलर, दिग्वेश सिंग, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्झके, मिचेल मार्श, प्रिन्स यादव, राजवर्धन हंगर्गेकर, शाहबाझ अहमद, शामर जोसेफ, युवराज चौधरी, आकाश सिंग.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

कर्जमाफीवरून गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल

विधिमंडळ, सरकार, प्रशासनाचे नाते काय?

लव्ह जिहाद : भ्रम आणि वास्तव