क्रीडा

BCCI च्या निर्देशानंतर KKR चा मोठा निर्णय; मुस्तफिजुर रहमानला संघातून डच्चू

आयपीएल २०२६ च्या आधीच कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. केकेआर संघाने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला अधिकृतपणे संघातून बाहेर काढल्याची घोषणा केली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

आयपीएल २०२६ च्या आधीच कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. केकेआर संघाने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला अधिकृतपणे संघातून बाहेर काढल्याची घोषणा केली आहे. हा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्या निर्देशानंतर घेतल्याचे केकेआर (KKR) कडून स्पष्ट करण्यात आले.

केकेआरने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बीसीसीआय (BCCI) च्या सूचनेनुसार आणि आवश्यक प्रक्रियेचे पालन करत मुस्तफिजुरला संघातून बाहेर काढले आहे.” तसेच आयपीएल नियमांनुसार संघाला त्याच्या जागी पर्यायी खेळाडू घेण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

याआधी बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुस्तफिजुरला संघातून बाहेर काढण्याचे निर्देश दिले होते. आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात केकेआरने मुस्तफिजुरला तब्बल ९.२० कोटी रुपयांना विकत घेतले होते, ज्यामुळे तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा बांगलादेशी खेळाडू ठरला होता.

मात्र, बांगलादेशातील राजकीय-सामाजिक परिस्थिती आणि अल्पसंख्याकांवरील कथित हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्याच्या सहभागावरून वाद निर्माण झाला होता. अखेर बीसीसीआयच्या हस्तक्षेपानंतर केकेआरने हा निर्णय घेतला असून, आता संघ दुसऱ्या गोलंदाजाच्या शोधात असल्याची शक्यता आहे.

वेळेआधीच मान्सूनची माघार; मुंबईसह महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची घोषणा

शिवाजी पार्कवर विनापरवानगी आंदोलन; ५०० जणांवर गुन्हे, दीपकेंसह आयोजकांचा समावेश

'मविआ'त नाराजीनाट्य; काँग्रेसने विधान परिषद उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी; नेत्यांमध्ये आज पुन्हा चर्चा

जंतरमंतरवर १५० आंदोलक ताब्यात; नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा समावेश

तीन वर्षांतच खटल्यांचा निकाल; गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा; BNS ची पूर्ण अंमलबजावणी गरजेची